maval ncp news. Sarkarnama
पुणे

Maval News: अजितदादांचा आमदार अडचणीत? शेळके यांच्याविरोधात भेगडेंनी थोपटले दंड

Ajit Pawar NCP MLA Sunil Shelke Problems Will Increase: आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आला आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे.

Mangesh Mahale

आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आला आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. यावर पत्रकार परिषद घेऊन भाजपने दावा ठोकला आहे. ही जागा कमळाच्या चिन्हावर लढवण्यासाठी आग्रह धरला आहे. आता मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होणार, हे उघड आहे.

मावळ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.आगामी विधानसभेसाठी मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार असल्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले.

भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष असून संघटनेच्या ताकदीवर लोकप्रिय लोकप्रतिनिधी निवडून येणार महायुतीत तीनही पक्ष उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्न करीत आहेत. मात्र मावळच्या विधानसभा जागेवरून महायुतीत आघाडी बिघाडी होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कुठल्याही परिस्थितीत मावळ विधानसभेची जागा भाजप खेचून आणणार असल्याचा विश्वास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केली. दोन ऑगस्ट रोजी वडगाव येथे आगामी विधानसभेची निवडणुकीची दिशा ठरविण्यात येणार आहे. मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे.

मावळवर भाजपने दावा ठोकल्यामुळे अजित पवार (Ajit Pawar)गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला ती जागा सोडायची, असा महायुतीनं विधानसभेसाठी बेसिक फॉर्म्युला ठरवला आहे. पण दुसरीकडे मावळ विधानसभेत भाजपनं शड्डू ठोकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT