Sunil Shelke Sarkarnama
पुणे

Sunil Shelke News: सुनील शेळकेंच्या आदेशानंतर राजकीय भूकंप; 9 संचालकांच्या निर्णयाने बाजार समिती बरखास्त होणार?

Maval Market Committee News: दिवसभर वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि अखेर 13 पैकी 9 संचालकांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात राजीनामे सादर केले. त्यामुळे या प्रकरणाने आणखी नाट्यमय वळण घेतले आहे.

सरकारानामा ब्युरो

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या घडामोडींनी राजकीय भूकंप झाला आहे. 18 पैकी 9 संचालकांनी आपले राजीनामे सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर केल्याने बाजार समिती बरखास्त होणार की उर्वरित 9 सदस्यांवर संस्था तरणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सभापती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अनपेक्षित पराभवाबाबतचे सविस्तर वृत्त आज ‘सरकारनामा’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दिवसभर वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आणि अखेर 13 पैकी 9 संचालकांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात राजीनामे सादर केले. त्यामुळे या प्रकरणाने आणखी नाट्यमय वळण घेतले आहे.

राजीनामे सादर करणाऱ्यांमध्ये सुप्रिया मालपोटे, अंजली जांभुळकर, भरत टकले, अमोल मोकाशी, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विक्रम कलवडे, नथुराम वाघमारे आणि विलास मालपोटे यांचा समावेश आहे. मात्र , सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले संभाजी शिंदे, नामदेव शेलार, विलास मानकर, शंकर वाजे यांनी राजीनामे दिलेले नाही.

मावळ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 आणि काँग्रेसचा 1 असे एकूण 13 सदस्यांचे स्पष्ट बहुमत, तर भाजपचे केवळ 5 सदस्य आहेत. असे असतानाही सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला 11 मते, तर राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला केवळ 7 मतांवर समाधान मानावे लागले. यामुळे पक्षातील सहा मते फुटल्याचे स्पष्ट झाले.

या पराभवानंतर आमदार सुनील शेळके यांनी पक्षाच्या सदस्यांना तातडीने राजीनामे सादर करण्याचे आदेश दिले होते. सध्या राष्ट्रवादीचे 4 सदस्य आणि भाजपचे 5 सदस्य असे एकूण 9 सदस्य उर्वरित राहिले आहेत. त्यामुळे 18 सदस्यांच्या समितीत 9 सदस्यांवर कोरम पूर्ण होतो का, संस्था कार्यरत राहते का, की बरखास्तीची प्रक्रिया सुरू होते, याबाबतचा अंतिम निर्णय सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT