

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी आज आपला अर्ज भरला. त्यांनी अर्ज भरण्यापूर्वी बारामतीच्या प्रशासकीय इमारतीवर एका बँनरचे सगळ्याचे लक्ष वेधून घेतलं. या बॅनरची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
बारामती अज्ञात व्यक्तींनी हा बॅनर लावला आहे. हा बॅनर लावणाऱ्यांनी आपली ओळख, "समस्त दादा प्रेमी" अशी सांगण्यात आली आहे. राष्ट्रवीदीचे नेते, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा एकेरी उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांच्या विरोधातील मजकूर यावर लिहिण्यात आला आहे.
"अजितदादांचे फक्त नावच पुरेसं आहे!" असं ठसठशीत अक्षरात लिहिण्यात आलं आहे. याच बॅनरवर पुढील ओळीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा घातकी असा उल्लेख करण्यात आला आहे. "घतकी तटकरे-पटेलची गरज नाही," असं या बॅनरवरील शेवटच्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे.
मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करीत आज सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुळे, चेतन तुपे, अनिल पाटील, सना मलिक आदी नेतेमंडळी यावेळी उपस्थित होते.
सुनेत्रा वहिनींना अर्ज भरण्यापूर्वी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. यात सुनेत्रा पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. भाषण करीत असताना त्या भावूक झाल्या.
त्या म्हणाल्या, "दोन महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाही, असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, की बारामतीची पोटनिवडणुक होईल. अजितदादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. बारामतीकरांकडे बघूनच मला धीर आला,"
सुनेत्रा पवार बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू असतानाही काँग्रेसने उमेदवार दिला असून अनेक अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे असे मिळून या लढतीत एकूण 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याने ही निवडणूक रंजक होणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने अॅड. आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले आहे. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात धनगर समाजाचा चेहरा म्हणून मोरे यांना संधी देण्यात आली. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.