Maval News : शिरूर लोकसभेच्या युती आणि पक्षाच्या समन्वय बैठकीकडे भाजपच्या काही नाराज स्थानिक नेत्यांनी नुकतीच पाठ फिरवली. त्याची परिणती रविवारी (7 एप्रिलला) अतुल देशमुख यांच्या पक्ष सोडण्यात झाली. नाराजी तथा बंडाचे हे लोण 'मावळ'मध्ये पण, ते आघाडीत येऊन धडकले. त्यामुळे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचे टेन्शन तूर्त तरी वाढले आहे.
आघाडीच्या पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-chinchwad) रविवारी झालेल्या पहिल्याच मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला. इतकेच नाही, तर थेट बंडाचा झेंडा फडकावत मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा, असा इशारा काँग्रेसने ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला. शिवसेनेने सांगलीत काँग्रेसला डावलून पैलवान चंद्रहास पाटील यांना उमेदवारी दिली. त्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या सांगलीच्या दौऱ्यात काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने सांगलीत ऐकले नाही, तर राज्यात काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना घरी बसवू, असा इशारा राऊत यांनी दिला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार राऊतांचा नामोल्लेख टाळून त्यांचे वरील वक्तव्य हे चुकीचेच नाही, तर वेदनादायक, बेताल असल्याने त्याबद्दल त्यांना त्यांच्या नेत्यांनी समज द्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली. राऊतांच्या वक्तव्यानंतर शहर काँग्रेसने रविवारी तातडीने बैठक घेत ही मागणीच नाही केली, तर आघाडीच्या मेळाव्यावर बहिष्कारही टाकला. त्याला आवर घाला, समज द्या, असे राऊतांना कदमांनी एकेरीवर घेतले. नाही तर मावळमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा, असा इशाराही त्यांनी दिला. त्यासाठी आपली लढण्याची शंभर टक्के तयारीही झाल्याचे त्यांनी सांगितले.
सांगलीत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) इच्छुक आहेत. ही जागा पक्षाला सोडण्याची मागणी कैलास कदम यांनी केली. दरम्यान, उमेदवारीसाठी सांगलीचे पाटील व कदम हे दिल्लीला खास हेलिकॉप्टरने गेले होते. त्यावर त्यांचे हे हेलिकॉप्टर गुजरातच्या दिशेने जाऊ नये, अशी उपरोधिक टीका राऊतांनी केली होती. त्याचाही कैलास कदमांनी समाचार घेतला.
(Edited by : Chaitanya Machale)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.