Lok Sabha Election 2024 : उठा पुणेकरांनो, आळस झटका अन्‌ मतांचा टक्का वाढवा...

Pune Lok Sabha Constituency : पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकीत 55 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले नाही. त्यामुळे पुणेकर यंदा तरी सुटी एन्जाय न करता, आळस झटकून मतदानाला घराबाहेर पडतील आणि भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 08 April : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून निवडणुकांकडे पाहिलं जातं. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी मतदानाच्या प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उपक्रम राबवून मतदारांमध्ये जागृती केली जाते. मात्र, असे असतानाही निवडणुकीच्या काळात मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याचे चित्र पाहायला मिळते.

निवडणुकीत मतदान (Voting) करण्याचा आपला अधिकार मतदारांनी बजावावा, यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, असे असतानाही निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याचे दिसते. पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha Constituency) गेल्या तीन निवडणुकीत 55 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले नाही. त्यामुळे पुणेकर यंदा तरी सुट्टी एन्जाय न करता, आळस झटकून मतदानाला घराबाहेर पडतील आणि भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Solapur Lok Sabha 2024 : प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर करताना आडम मास्तरांचा ‘शहर मध्य’बाबत मोठा दावा...

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील (pune) मतदारसंघात अशी परिस्थिती असेल, तर राज्यातील इतर शहरांनी कोणाचा आदर्श घ्यायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. मतदार यादीत नाव आलेल्या व्यक्तीला निवडणुकीत आपला हक्क बजाविता येतो. त्यासाठी वर्षेभर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याचे दिसून आले आहे. मतदान केंद्रांची माहिती नाही. मतदार यादीत नाव नव्हते, आजारपणामुळे मतदानासाठी जाणे शक्‍य नाही. नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने मतदान करता आले नाही, अशी कारणे पुढे केली जातात.

मतदान करण्याची इच्छा आहे मात्र सुटी मिळत नसल्याने मतदान करता येत नाही. खासगी कंपन्या, संस्था सुट्या देत नाहीत किंवा मतदानाच्या वेळेत कार्यालयातून लवकर सोडत नाहीत, अशी तक्रारही अनेकदा केली जाते. या पार्श्वभूमीवर आता मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे. ज्या संस्थांना अथवा कंपन्यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देता येणार नाही, त्यांनी आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी काही वेळ सवलत द्यावी, असे या अध्यादेशात म्हटले आहे.

सरकारच्या अध्यादेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासगी कंपन्यांवर तसेच संस्था संघटनांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ज्या कंपन्यांना कर्मचाऱ्यांना सुट्टी देणार नाहीत, त्यांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून कामाच्या वेळेत थोडी मुभा देण्याची सवलत द्यावी, अशी मागणी करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर या खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात सवलत देऊन मतदानासाठी सोडता येणार आहे. शक्यतो मतदानाच्या दिवशी सुट्टी द्यावी, असा नियम आहे. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी सुट्टी न देता ठराविक वेळ सवलत द्यावी, त्यासाठी खासगी कंपन्यांना परवानगी देऊ शकतात, असे निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Lok Sabha Election 2024
Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापुरात मुश्रीफांना मोठा झटका; निष्ठावंताचा मंडलिकांच्या प्रचारास नकार, काँग्रेससोबत राहणार

मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांनी आपला हक्क बजावावा, यासाठी सुट्टी तसेच कामाच्या वेळेत सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का 55 टक्क्यांच्या पुढे जाणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील मागील तीन निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी...

वर्ष टक्केवारी

  • 2009 ......... 40.66

  • 2014........... 54.14

  • 2019............ 49.87

Edited By : Vijay Dudhale

R

Lok Sabha Election 2024
Satara Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातील इच्छुक थेट पवारांनाच म्हणाला, 'कुणी उमेदवार भेटतोय का नाही, तर मी आहेच'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com