Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Maval Lok Sabha Election 2024: अजितदादांच्या आमदारानं सांगितली 'मन की बात' खदखद पुन्हा समोर...

सरकारनामा ब्यूरो

Maval Lok Sabha Election 2024: मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील खदखद सतत समोर येत आहे. कधी काळी कट्टर विरोधक असणाऱ्या श्रीरंग बारणेंचा (Srirang Barne) प्रचार खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) करत आहेत. श्रीरंग बारणेंनी मागील लोकसभा निवडणुकीत अजितदादांचे पुत्र पार्थ पवारांचा दारुण पराभव केला होता. हा पराभव विसरुन युती धर्मासाठी अजित पवार बारणेंसाठी प्रचारसभा घेतायेत. मात्र याच प्रचार सभेत बोलताना अजितदादांच्या गटातील नेत्याने मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

श्रीरंग बारणेंना (Shrirang Barne) आम्ही पुन्हा खासदार करण्यासाठी झटत आहोत. महायुतीतील पदाधिकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी झोकून काम करायला हवं. घराघरात धनुष्यबाण पोहचायला हवं, असं म्हणत मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी मनातील खदखद अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. त्यांनी काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांना इशारा देखील दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेळके म्हणाले, "मागील चार वर्षे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (BJP And NCP) असा संघर्ष केला. मात्र समीकरणं बदलली आणि आपण हातात हात घालून काम करायला लागलो. श्रीरंग बारणे यांना उमेदवारी घोषित केल्यावर मी महायुतीचा धर्म पाळेन, हे ठामपणे जाहीर केलं. अजित दादांच्या सुचनेने आम्ही इमाने इतबारे काम सुरू केलं. पण अनेकांना आश्चर्य वाटलं.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सुनील शेळके उघडपणे बारणेंना विरोध करत होता. मग अचानक पलटी का घेतली? कारण बारणेंना मी लेखाजोखा मांडायला सांगितला होता, तो त्यांनी मांडला. म्हणूनच आज बारणेंना आम्ही पुन्हा खासदार करण्यासाठी झटत आहोत. महायुतीतील पदाधिकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी झोकून काम करायला हवं. घराघरात धनुष्यबाण पोहचायला हवं." असं म्हणत शेळकेंनी मनातील खदखद बोलून दाखवली.

शिवाय ते पुढे म्हणाले, साडे चार वर्षे खूप संघर्ष पाहिला. मात्र जोपर्यंत माझी नियत साफ आहे, तोपर्यंत माझ्याकडून मावळचा विकास होत राहील. दिवसा धनुष्यबाण आणि रात्री कोणी मशालीचं काम करत असेल तर चार जून नंतर मशाली समोरचे चेहरे कोण होते? जाहीरपणे सांगणार असल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला. तसंच जिथं राहायचं तिथं निष्ठेने राहायचा, जिथं शब्द द्यायचा तिथं पक्क राहायचं. हे मी वरिष्ठांकडून शिकलो आहे, असं म्हणत दोन्ही पक्षांची कामं करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुनील शेळके यांनी तंबी दिली.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT