Raj Thackeray News : राज ठाकरे यांच टार्गेट, पूर्वश्रमीचे दोन मनसैनिक; पुण्यातील सभेत घेणार समाचार?

Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यामध्ये येऊन काय बोलणार आणि नुकताच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचितची उमेदवारी घेणाऱ्या वसंत मोरे यांचा कशाप्रकारे समाचार घेणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.
Vasant more, Ravindra dhngekar, Raj thackeray
Vasant more, Ravindra dhngekar, Raj thackeray Sarkarnama

Pune News : पुणे लोकसभेसाठी सोमवारी मतदान होणार असल्याने प्रचार शिगेला पोचला आहे. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांनी शहर व परिसर पिंजून काढला आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.

पुण्यामध्ये यंदा तिरंगी लढत होत असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे (Vasant More ) हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे दोघेही पूर्वीचे मनसैनिक आहेत. त्यामुळे मनसेला मानणाऱ्या मतदारांचा कल या दोघांच्या बाजूने असू शकतो, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुण्यामध्ये येऊन काय बोलणार आणि नुकताच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचितची उमेदवारी घेणाऱ्या वसंत मोरे यांचा कशाप्रकारे समाचार घेणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. (Raj Thackeray News)

Vasant more, Ravindra dhngekar, Raj thackeray
Arvind Kejriwal Bail | मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक होते. मात्र मनसेने ही निवडणूक लढवण्यात असमर्थता दाखवली. यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक काही करून लढायचीच असा चंग बांधलेले वसंत मोरे नाराज झाले आणि त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

पक्षाला सोडचिठ्ठी देताना आपल्या मनात राज ठाकरे यांच्यासाठी कायम आदर असल्याचे सांगितले. मात्र, आपण पक्षाला सोडचिठ्ठीत देत आहे यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे जबाबदार असल्याचं आपल्या वक्तव्यातून त्यांनी जाणीव करून दिली.

या साऱ्या प्रकरणांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण त्यांच्याशी संवाद करणं टाळला असं वसंत मोरे यांनी सांगितलं होतं. मात्र मनसे नेत्यांनी वसंत मोरे यांचा हा दावा खोडून काढत राज ठाकरे यांनी कोणताही संपर्क साधला नसल्याचे पत्रकच काढलं होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यानच्या काळात अमित ठाकरे हे पुण्यामध्ये आले असताना अनौपचारिक गप्पा दरम्यान बोलताना वसंत मोरे यांना उद्या पंतप्रधान होण्याची स्वप्न देखील पडतील, असा उपरोधक टोला त्यांनी लगावला होता. या साऱ्या घडामोडी घडत असताना राज ठाकरे यांच्याकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. वसंत मोरे यांच्या बाबतीत बोलणं राज ठाकरे यांनी सपशेल टाळलं होतं.

आता राज ठाकरे हे पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या विरोधात उभे असलेले दोन्ही उमेदवार हे पूर्वी मनसेमध्ये होते आणि वसंत मोरे यांनी विविध आरोप करत नुकतीच मनसे सोडली आहे. त्यामुळे वसंत मोरे यांनी केलेला आरोपांना उत्तर देण्यासाठी पुण्यातील ही सभा एक उत्तम प्लॅटफॉर्म ठरू शकतो, असे बोललं जात आहे. त्यामुळे सभेदरम्यान राज ठाकरे हे वसंत मोरे यांचा उल्लेख न करता जागा दाखवून देणार की त्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

Vasant more, Ravindra dhngekar, Raj thackeray
Raj Thackeray Konkan : उद्धव ठाकरे अन् नारायण राणे यांच्यात 'असा' फरक; राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com