Rohit Pawar, Sunil Shelke Sarkarnama
पुणे

Sunil Shelke News: "पवार 'रामकृष्ण हरी वाजवा तुतारी' म्हणतात, पण दुसरीकडे दोन हजार टन मटणाच्या...", शेळकेंचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election Phase 3: आज देशभरात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान पार पडत आहे. तर आजच्या या तिसऱ्या टप्प्यात अनेक लक्षवेधी लढत असणाऱ्या मतदानसंघासाठी मतदान होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आजच्या मतदानाच्या दिवशीदेखील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करणं बंद केलं नसल्याचं दिसत आहे. कारण अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार सुनील शेळके यांनी आज रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, बारामतीच्या युवराजांना सांगायच आहे. निवडणूक ही लोकशाहीच्या मार्गाने झाली पाहिजे. त्यांनी नोकरी आणि व्यवसायातील लोकांनादेखील प्रचारात उतरवलं तरीही आम्ही त्यांच्यावर आक्षेप घेतला नाही. मात्र, आता ते भोर (Bhor), वेल्ला येथे गाडीत पैसे टाकल्याचा अर्धवट व्हिडिओ बनवत आहेत. हे पहाता त्यांच्या पाया खालची वाळू सरकली असून त्यांना समोर पराभव दिसत आहे असं शेळके म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते पुढे म्हणाले, भोरमधील स्थानिक गुंडांना हाताशी धरून भोरमधील युवक अध्यक्षांना घरात घुसून मारहाण केली. याची शिक्षा त्यांना भोगावीच लागेल. शिवाय या घटनेची पोलिसांनी सत्यता तपासावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. रोहित पवार हे 'रामकृष्ण हरी वाजवा तुतारी' म्हणतायत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्राच दैवत खंडोबा येथे मटणाच्या दोन हजार टन गाड्या खाली केल्या, मटण, दारू, यासंह मतांना दोन हजार वाटल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

पवारांची नौटंकी सुरू आहे

तसेच रोहित पवारांची नौटंकी सुरू आहे. नौटंकी करून राजकारण करू नका. त्यांनी स्वतः चं कर्तृत्व दाखवून मोठं व्हावं. अजित पवारांना (Ajit Pawar) व्हिलन करून रोहित पवार मोठे होणार नाहीत. बारामतीच्या निकालावरुन बरच काही स्पष्ट होईल असंही शेळकेंनी म्हटलं.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT