Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीसाठी मंगळवारी (ता. 7) सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. ऐन मतदानादिवशी आरोप - प्रत्यारोपांनी आणि धमक्यांच्या घडनांनी बारामतीचे वातावरण तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंनी मतदान केल्यानंतर थेट काटेवाडीतील अजित पवारांचे घर गाठले. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळेंना जोरदार टोला लगावल आहे.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार आणि त्यांच्या आईची भेट घेतली. या भेटीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी Amol Mitkari टीका केली आहे. ही भेट म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या भावनिक राजकारणाचा भाग असल्याचे मिटकरी म्हणाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या भागात प्रचाराला सुळे फिरत आहेत. त्यावेळी मात्र सुळेंना अजित पवारांच्या आईची भेट का घ्यावी वाटली नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या भेटीचा सेल्फी न काढून सुप्रियाताईंनी बरं केलं?, असा उपरोधिक टोलाही मिटकरींनी सुळेंना लगावला आहे.
दरम्यान ही भेट राजकीय नसल्याचे सुप्रिया सुळेंनी Supriya Sule स्पष्ट केले आहे. या भेटवर सुळे म्हणाल्या, मी माझ्या काका- काकीच्या घरी गेले होते. ते माझेच घर आहे. माझ्या सुमती काकी व आशा काकी मतदानासाठी काटेवाडीत आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. आमच्या सगळ्या काक्या आमच्या आईच आहेत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. राजकारण एका बाजूला आणि नाती एका बाजूला असते. आणि मी नेहमी नाती सांभाळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून बारामतीत शरद पवार आणि अजित पवार Ajit Pawar या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहे. मतदानादिवशी आमदार रोहित पवारांनी अजित पवार गटाकडून पैशांचा मोठ्या प्रामाणात वापर होत असल्याचा आरोप केला आहे. तर ते आरोप धांदात खोटे आहेत. मी विकास कामांना महत्त्व देणारा माणूस असून अशा आरोपांकडे लक्ष देत नाही, असे प्रत्युत्तर अजित पवारांनी मतदानानंतर दिले आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी अजितदादांचे घर गाठल्याने बारामतीत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.