Crime News  Sarkarnama
पुणे

Maval Politics: बापू भेगडे- सुनील शेळके यांचे कार्यकर्ते भिडले; लोणावळ्यात राडा

Maval Vidhan Sabha Election 2024 Sunil Shelke Vs Bapu Bhegade: भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांच्यावर आरोप केले, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंदिरातून निघून जाण्याचा इशारा दिला.

Mangesh Mahale

Maval News: विधानसभा निवडणुकीला अवघे 11 दिवस शिल्लक असताना मावळ विधानसभा मतदारसंघातील (Maval Vidhan Sabha Election 2024) वातावरण तापलं आहे. लोणावळयात आमदार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राडा झाला.

काही काळ लोणावळ्यातील वातावरण तापले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आमदार सुनील शेळके लोणावळयात प्रचार करण्यासाठी गेले होते. लोणावळयातील राम मंदिरात शेळके यांनी दर्शन घेतले.

अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांच्यावर आरोप केले, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांना मंदिरातून निघून जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दीक वाद झाला.

लोणावळ्यातील राम मंदिराच्या बाहेर भेगडे आणि शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी जमा झाली होती. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर परिसरात तणाव वाढला. (Sunil Shelke Vs Bapu Bhegade)

पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. शेळके-भेगडे यांचे समर्थक समोरासमोर आल्याने धक्काबुक्की झाली. भेगडे यांच्याकडे कुठवाही मुद्दा नसल्याने ते मतदारसंघात दहशत निर्माण करीत आहेत, असा आरोप सुनील शेळके यांनी केला. भेगडे यांनीही शेळकेंना प्रत्युत्तर दिले.

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बापू भेगडे यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT