Mawal Election  Sarkarnama
पुणे

Mawal Lok Sabha News : मावळमध्ये पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही दाखल; पण 27 जणांनी नेले 49 अर्ज

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News : पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांनी गुरुवारी (ता. 18) उमेदवारी अर्ज भरले, तर पुणे जिल्ह्यातील मावळ या चौथ्या मतदारसंघात ते आजपासून भरण्यास सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, तर 27 जणांनी 49 अर्ज नेले.

मावळमध्ये (Mawal Lok Sabha) चौथ्या टप्यात निवडणूक होत आहे. त्याची सूचना गुरुवारी प्रसिद्ध झाली. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास तेथे सुरवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केला नाही. तर, 27 जणांनी 49 अर्ज नेले. (Mawal Lok Sabha News)

त्यात 10 डिसेंबर 2022 रोजी चिंचवड येथे तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करणारा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आणि कट्टर आंबेडकरवादी मनोज गरबडे याचा समावेश आहे. मात्र, आघाडी आणि युतीचे प्रमुख उमेदवार त्यात नाहीत. त्यात बहुतांश अपक्ष आणि छोट्या पक्षांचे उमेदवार आहेत.

मावळातील महायुतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग बारणे 22 तारखेला प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, तेथील आघाडीचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील हे 23 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

29 एप्रिल माघारीची शेवटची मुदत

त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Adiatay Thackeray) हे उपस्थित राहणार आहेत. मात्र, आज अपक्ष आणि ठाकरे शिवसेना म्हणूनही दत्तात्रय भगवंत वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज नेला. 25 तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 26 तारखेला त्यांची छाननी होईल. 29 एप्रिल ही माघारीची शेवटची मुदत आहे. 13 मे रोजी मतदान होऊन 4 जूनला निकाल लागणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT