Mawal Loksabha Constituency: बाळा भेगडेंच्या वाढदिवसानं वाढवलं बारणेंचं टेन्शन

Bala Bhegade and Shrirang Barne: मावळचे भावी खासदार म्हणून भाजपच्या भेगडेंचे होर्डिंग्ज लागल्याने ते लोकसभा लढण्याची चर्चा रंगली आहे.
Bala Bhegade and Shrirang Barne
Bala Bhegade and Shrirang BarneSarkarnama

Pimpri News: शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:ची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. त्यानंतर मावळातून पक्ष लढ म्हटला, तर तयार असल्याचे माजी मंत्री भाजपचे बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी गेल्या महिन्यात सांगितले. त्यातच आता वाढदिवसानिमित्त भावी खासदार म्हणून भेगडेंचे होर्डिंग्ज लागल्याने ते मावळमधून लोकसभेची निवडणूक लढण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

बाळा भेगडेंचे भावी खासदार असे होर्डिंग्ज मावळात आणि पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर लागल्याने खासदार श्रीरंग बारणेंचे (Shrirang Barne) टेन्शन वाढले आहे. दुसरीकडे मावळातून पुन्हा युतीचाच खासदार असेल, असा दावाही भेगडेंनी केला आहे.

पक्ष म्हटला लढा, तर माझ्यापेक्षा कार्यकर्ते जास्त उत्साहाने तयार आहेत, असे वक्तव्य भेगडे यांनी गेल्या महिन्यात केले आणि वाढदिवसाच्या होर्डिग्जच्या निमित्ताने लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली. कारण पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ऊर्से टोलनाक्यासह मावळात ठिकठिकाणी त्यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स झळकले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bala Bhegade and Shrirang Barne
Maval Loksabha : मावळात शिवसेना VS शिवसेना; बारणेंची हॅटट्रिक होणार की स्वप्न भंगणार?

मावळातील 2024 च्या लोकसभेच्या लढतीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. कारण फुटीनंतर शिवसेनेचेच दोन्ही गट तिथे युती आणि आघाडीकडून भिडणार आहेत. त्यातून बारणे खासदारकीची हॅटट्रिक साधणार की महाविकास आघाडी खोडा घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मावळसाठी ठाकरे गट तगडा आयात उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

या सर्व घडामोडींमुळे बारणेंचे टेन्शन काहीसे वाढले आहे. त्यात आता महायुतीतीलच भाजपच्या भेगडेंच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या बॅनरने भर टाकली. कारण भेगडेंचे हे मोठे होर्डिंग्ज लागलेल्या ऊर्से टोलनाक्यासह मावळात याअगोदर लोकसभेचे दुसरे इच्छूक संदीप वाघेरे यांचेही होर्डिंग्ज लागल्याने त्याची चर्चा झाली होती. हे बलदंड उमेदवार ठाकरे शिवसेनेकडून (आघाडी) लढणार असल्याने बारणेंचे टेन्शन अगोदरच थोडे वाढले होते.

वाघेरेंचे बॅनर संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात म्हणजे घाटाखाली आणि घाटावर लागले होते. तर, भेगडेचें मावळ तालुक्यातच म्हणजे विधानसभा मतदारसंघात लागले आहेत. पण, त्यावर भावी आमदार नाही, तर भावी खासदार असा उल्लेख असल्याने ते कळीचा मुद्दा ठरले आहेत.

त्यांचा वाढदिवस थर्डी फर्स्टला आहे. मात्र, त्यानिमित्त त्यांनी ग्रामस्वच्छता मोहीम, खेळ रंगला पैठणीचा, वृक्षारोपण, विविध स्पर्धा, किर्तन, आरोग्य शिबिर, शासन आपल्या दारी, कुस्ती आणि बैलगाडा शर्यत असे विविध कार्यक्रम 22 तारखेपासून सुरु केले आहेत. ते 5 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. त्यातून भेगडेंचे लक्ष्य विधानसभा हे असल्याचे शाबीत होत असले, तरी भावी खासदार म्हणून फ्लेक्सवर उल्लेख करत त्यांनी बारणेंना डिवचण्याची संधी साधल्याचे बोलले जाते.

(Edited By - Ganesh Thombare)

Bala Bhegade and Shrirang Barne
Ajit Pawar Vs Amol Kolhe : 'मी काल सांगितलं तेच फायनल, विषय संपला'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com