पुणे

महापौरांचा उपक्रम:कोरोनात नातेवाईक गमावलेल्या पाच हजार कुटुंबांना दिवाळी फराळ

ज्यांनी कुटुंबातील सदस्य गमावलेत. त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनामुळे पुण्यातील हजारो नागरिकांचा जीव गेला.अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा नागरिकांच्या घरात दिवाळी साजरी होणार नाही. पण, अशा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी व त्यातून त्यांना सावरण्यासाठी शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्येकाच्या घरी संदेशपत्र आणि दिवाळीचा फराळ पोचविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

महापौर मोहोळ यांनी आज ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. मात्र, दिवाळीचा सण अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे, हाच धागा पकडून कोरोनात प्रिय व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होणार आहे. या कुटुंबियांना संदेशपत्र व फराळ घरपोच दिला जाणार आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे सुमारे ५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वांच्या कुटुंबियांपर्यंत दिवाळीच्या निमित्ताने पोहचण्याचा प्रयत्न आहे. गेल्यावर्षी देखील हा उपक्रम राबवून सुमारे साडे चार हजार कुटुंबियांपर्यंत संदेशपत्र व फराळ पोचविला होता मोहोळ यांनी सांगितले.

ज्यांनी कुटुंबियांतील सदस्य गमावले आहेत, त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटुंबियांना आधार या माध्यमातून आधार देण्याच्या प्रयत्न सुरू आहे. हा दुःखाचा डोंगर मागे सारून नवी पहाट या कुटुंबियांमध्ये आणणे आवश्यक होते. त्या दृष्टीने ५ हजार कुटुंबांपर्यंत संदेशपत्र व फराळ पोचविला जात आहे, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT