पुणे : बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एका जिल्ह्यात इतकी संख्या असेल तर राज्यात किती संख्या असेल याचा विचारदेखील करवत नाही. मात्र, याचे गांभीर्य राज्य सरकारला नाही. एकाही मंत्र्याला त्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही. केवळ शाहरूख खानच्या मुलाला वाचविण्यातच त्यांना रस आहे,अशी घणाघाती टीका शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर केली.
पुण्यात बोलताना मेटे म्हणाले, ''राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामेदेखील यांच्याकडून गांभीर्याने होत नाहीत. त्यामुळे केवळ चार ते पाच हजारांची मदत देऊन हे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणार आहे, असे दिसून येत आहे.''
शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर दिवाळीनंतर लगेचच बीड जिल्ह्यात शिवसंग्रामच्या वतीने पहिला शेतकरी मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा मेटे यांनी यावेळी दिला.मराठा आरक्षणा बाबतीत वेळोवेळी शब्द देऊनही सरकार चालढकल करत आहे. सर्वोच्च न्यायालया बाबतीत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे, जिल्हावार वसतीगृह तसेच सारथी संस्थेतून देखील न्याय देऊ शकलेले नाही, असे मेटे यांनी सांगितले.
सत्ता मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. मात्र शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नही. कारण त्यांना राज्यातील सगळे प्रश्न संपले आहेत, असे वाटत आहे. त्यामुळेच ते शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची याची चिंता अधिक करीत आहेत. असे मेटे म्हणाले.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.