Pune News : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. मात्र, ही निवडच आता पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा काही क्रीडा संघटनांनी केला असून या विरोधात कोर्टामध्ये धाव घेतली आहे.
महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव सूर्यकांत पवार यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत धर्मादाय आयुक्तालयांच्या निकालाची प्रत सादर करत अजित पवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह विद्यमान पदाधिकाऱ्यांनाची झालेली निवड कायदेशीर नसल्याचा दावा केला आहे. तसेच याविरोधात महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनसह हॉकी महाराष्ट्र, महाराष्ट्र जल जलतरण संघटना आदी संघटनांनी एकत्र आल्या आहेत.
२ ऑक्टोबरला मतदान न घेता थेट बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचा ठपका ठेवत सूर्यकांत पवार यांनी मुंबई हायकोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. लवकरच कोर्टाच्या आदेशानुसार MOA ला नव्याने पूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आता दावा देखील त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर (रविवार) रोजी MOA ची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे. मात्र धर्मादाय आयुक्तांचा निकाल आणि कोर्ट प्रक्रिया लक्षात घेता ही सभाही बेकायदेशीर ठरू शकते, असा दावा विरोधक करत आहेत.
हॉकी महाराष्ट्रचे सहसचिव रणवीरसिंह यांनी सांगितले की, “क्रीडा लवादाच्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीला फक्त दोन टर्मच अध्यक्ष/पदाधिकारी होता येते. अजित पवार हे चौथ्यांदा अध्यक्ष बनले आहेत, हा थेट नियमभंग आहे” दरम्यान, गेल्या १०-१२ वर्षांत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये १२ कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक भ्रष्टाचाराचेही आरोप होत आहेत. पार्श्वभूमी वरती सध्या तरी अजित पवार आणि मुरलीधर मोहळ यांच्या नवीन कार्यकाळाला सुरू सुरू झाला आहे. तर आता यानिमित्त वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानं या नियुक्त्या हायकोर्टाच्या पुढील सुनावणीवर अवलंबून असणार आहेत. पण जर निकाल विरोधात गेल्यास दोन्ही नेत्यांना पद सोडावं लागण्याची दाट शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.