Satara Grampanchayat Election
Satara Grampanchayat Election Sarkarnama
पुणे

Grampanchayat Elections 2023 : मेडदमध्ये मतदानात तुंबळ हाणामारी; पिस्तूलचा वापर? एकमेकांविरुद्ध तक्रारी

कल्याण पाचांगणे : सरकारनामा

Malegaon : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज काही ठिकाणी हाणामारीचे प्रकार घडले. कोल्हापुरात चिंचवाड, अमरावती जिल्ह्यांतील कारला येथे दोन गटांत वाद झाला. मेडद (ता. बारामती) येथेही मतदानाच्या वेळी हाणामारी झाल्याने गालबोट लागले आहे. माजी सरपंच, सदस्यांसह अनेक कार्य़कर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.

निवडणुकीमध्ये परस्परांविरोधात काम केल्याच्या कारणावरून काल (शनिवार) वाद झाला. या घटनेचे पडसाद आज (रविवारी) मतदानाच्यावेळी उमटले. माळेगाव पोलिस ठाण्यात या प्रकरणी परस्परांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तब्बल २४ संशयित आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रसिक कांबळे ( रा. मेडद) यांनी सातपेक्षा अधिक लोकांनी कोयत्याच्या साह्याने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार माळेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी वैद्यकीय अहवाल व माहितीच्या आधारे संतोष शिवाजी यादव, आनंद पांडुरंग यादव, सोनु पांडुरंग यादव, अर्जुन शंकर यादव (माजी सरपंच, मेडद), राजाराम विश्वनाथ गाढवे, रोहिदास रामचंद्र निकम, राजाराम विश्वनाथ गाढवे (सर्व रा. मेडद) यांच्यासह पाच ते सात लोकांविरुद्ध अॅट्राॅसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

फिर्यादी अर्जुन शंकरराव यादव (वय ५९ रा. मेडद) यांनी रात्रीच्यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून माझ्या अंगावरील सुमारे ९ लाख रुपये किमतीचे सोन्याचा ऐवज सहा जणांनी चोरून नेला, अशी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी बंडा काशिद, गणेश काशिद, माऊली काशिद, सोनाजी मोरे, मानसिंग जाधव, सागर शिंदे ( सर्व रा. मेडद) यांच्याविरुद्ध दरोडा टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

संतोष शिवाजी यादव (रा. मेडद) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी सुधीर गावडे, बबन गावडे, नितीन माहीते, भैया मोहिते, ऋषी गावडे, देविदास गावडे, प्रकाश मोरे, विकास मोरे, अजित कांबळे, सीताराम कांबळे, प्रसिक कांबळे (सर्व रा. मेडद) यांच्याविरुद्ध पिस्तुलाचा धाक दाखवून एक लाख ३० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज घेऊन गेल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी किरण अवचर करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT