Medha Kulkarni News  Sarkarnama
पुणे

Rajya Sabha Election 2024 : निष्ठावंतांना न्याय मिळतो; उमेदवारी मिळताच मेधा कुलकर्णींचा कंठ दाटून आला

Medha Kulkarni Gets Rajya Sabha Ticket : पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी...

Sudesh Mitkar

Medha Kulkarni Bjp Pune News :

भाजपकडून राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून पक्षाने दुर्लक्ष केल्याने नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना आता थेट राज्यसभेचं बक्षीस मिळाले आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केलाय.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, 'खूप आनंद आणि समाधान वाटते की, पक्षांनी मला ही संधी दिली. यासाठी मी पक्षाचे आभार मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, या नेत्यांचे त्यांनी आभार मानते.'

'अनेक वर्ष मी पक्षाचे काम करत आहे. जराही निष्ठा, कार्यक्षमता ढळू न देता मी काम केले आहे. पक्ष या गोष्टींची दखल घेत असतो. हे ऑब्झर्वेशन पक्षाने केले. त्यामुळेच मला निष्ठेचे फळ मिळाले असल्याचे मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या.

कसबा पोटनिवडणूक निकालाचा परिणाम?

कसबा पोटनिवडणुकीमध्ये ब्राह्मण उमेदवार दिला नाही. यामुळे समाजामध्ये नाराजी होती, ती दूर करण्यासाठी आपल्याला उमेदवारी दिली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ब्राह्मण समाजाला आपल्या रिप्रेझेंटेशन मिळावं, अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. मात्र भारतीय जनता पार्टीला मतदान करणे हा ब्राह्मण समाजाचा आवडता विषय आहे. ते स्वेच्छेने मतदान करतात. ते नरेंद्र मोदींना मतदान करतात. त्यांची विचारधारा आणि हिंदुत्व, देशाचा वाढलेला सन्मान या गोष्टींचा सारासार विचार करून समाज मतदान करत असतो. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीमध्ये झालेला पराभव हा कोणा एका समाजाच्या माध्यमातून झाला नसल्याचं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'निष्ठावंतांना न्याय मिळतो'

भाजपमध्ये वाढलेल्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना कुलकर्णी म्हणाल्या, 'पक्ष वाढत आहे. अनेकांना पक्षाची विचारधारा आणि मोदींनी केलेला विकास रुचत असल्यामुळे पक्षात येत असतील तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही. मात्र याचबरोबर मला उमेदवारीची संधी देऊन पक्षाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की निष्ठावंतांना न्याय मिळतो.'

मागील काळामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडल्या त्यावर आता मी भाषा करणार नाही, असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असून त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT