Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol On Tanaji Sawant : बँकॉकला जाणाऱ्या तानाजी सावंतच्या मुलाला परत कसा आणला? मंत्री मुरलीधर मोहोळांनी सांगितली पडद्यामागची खरी स्टोरी

Murlidhar Mohol Tanaji Sawant Son Rushiraj : ऋषिराज ज्या विमानाने चालला होता ते विमान परत कसे आणला आणि त्या दिवशी नेमके काय घडले होते? याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Roshan More

Murlidhar Mohol News : माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज फेब्रुवारी महिन्यात पुणे विमानतळावरून बँकॉकला चार्टर्ड विमानाने निघाला होता. मात्र, तानाजी सावंत यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन केला आणि ज्या विमानाने ऋषिराज देशाबाहेर जात होता ते विमान परत पुणे विमानतळावर फिरवण्यात आले.

ऋषिराज परत पुणे विमानतळावर उतरला मात्र मंत्री मोहोळ यांच्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात आली. ऋषिराज ज्या विमानाने चालला होता ते विमान परत कसे आणला आणि त्या दिवशी नेमके काय घडले होते? याची माहिती मंत्री मोहोळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

मुरलधीर मोहोळ म्हणाले,'मी जे केलं ते कायद्याच्या चौकटीत केलं. मी म्हटलं पुणे पोलिसांकडे जा. पुणे पोलिस आमच्या मंत्रालयाला मेल करतील. त्यामुळे त्यांनी तसं केलं. शेवटी मी एका पदावर काम करत असलो तरी माझ्या पदाचा सत्तेचा गैरवापर मी कदापी करणार नाही.'

'मुलगा संकटात आहे. तो विमानतळावर गेलाय हे त्यांनी (तानाजी सावंत) मला सांगितले. तेव्हा त्यांना माहीत नव्हते तो कुठे चाललाय. त्याच्यासोबत जी दोन लोकं आहेत ती कदाचित चांगली नाहीत,असं कोणीही येऊन सांगितलं तर मला मदत केली पाहिजे. अशावेळी मंत्री आहे की आमदार आहे, हे नाही पाहिले जात. तिथे समोरच्या माणसाला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा असते. बाकी नंतर विषय उलगडत गेले.', असे देखील मोहोळ म्हणाले.

पायलटशी संपर्क होत नव्हता अन्...

मोहोळ यांनी सांगितले, 'पुणे पोलिसांनी आधी आमच्या मंत्रालयाला मेल केली मग आम्ही एटीसीच्या माध्यमातून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले. पायलटला सूचना दिल्या की तुम्ही देशाच्या बाहेर जायचे नाही तुम्ही परत फिरा. पायलटपर्यंत मेसेज जात नव्हता मग दुसऱ्या विमानाच्या माध्यमातून त्यांना मेसेज दिला गेला. अन् मग ते फिरले. अडचणीत असलेला माणूस कोण आहे? काय आहे? हे न पाहता त्याला मदतीची गरज आहे हे मी पाहिलं.',

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT