Murlidhar Mohol Leg Surgery  sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol News : मंत्री मुरलीधर मोहोळ सक्तीच्या विश्रांतीवर, 29 वर्षांपूर्वीच दुखणं उद्भवलं अन्…, स्वतः सांगितलं काय झालं?

Murlidhar Mohol Leg Surgery : मंत्री मुरलीधर मोहोळ हे एका महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीवर जावे लागले आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याच्या सक्तीच्या विश्रांतीवर जावे लागले आहे. डॉक्टरांच्या सूचनेनुसार मोहोळ ही विश्रांती घेत असून 29 वर्षांपूर्वी कुस्ती दरम्यान झालेले दुखणं आत्ता उद्भवल्याने ही सक्तीची रजा त्यांना घ्यावी लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार मुरलीधर मोहोळ यांना पायाचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांनी याबाबत इलाज करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

माहिती देताना मुरलीधर मोहळ म्हणाले, २९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती घ्यावी लागत आहे.

खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय., असे त्यांनी म्हटले आहे.

पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमान, आशा भावना देखील मोहोळ यांनी व्यक्त केली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT