North Korea Missile Launch : संपूर्ण जगाला ज्याची भीती अखेर तेच घडलं! किम जोंग-उन यांनी क्षेपणास्त्रे डागली, तिसरं महायुद्ध भडकणार?

North Korea ballistic missile : इराण आणि इस्राइलमधील युद्धामळे संपूर्ण जग चिंतेत असतानाच आता जगासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरिया लष्करी सराव करत असताना उत्तर कोरियाने समुद्रात क्षेपणास्त्रे डागली आहेत.
North Korea Missile Launch
North Korea launches a suspected ballistic missile toward the Sea of Japan during US–South Korea Freedom Shield military drills, escalating regional security tensions.Sarkarnama
Published on
Updated on

North Korea Missile Launch : मध्यपूर्वेतील इराण आणि अमेरिका-इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध काही थांबण्याचं नाव घेईना. तब्बल 15 दिवसानंतरही या युद्धात अद्याप कोणीही माघार घेतलेली नाही. शिवाय या युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे.

इराण आणि इस्राइलमधील युद्धामळे संपूर्ण जग चिंतेत असतानाच आता जगासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरिया लष्करी सराव करत असताना उत्तर कोरियाने समुद्रात क्षेपणास्त्रे डागली आहेत.

याबाबत जपानच्या पंतप्रधानांनी एक्सवर माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कदाचित उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले असावेत, प्राथमिक माहितीनुसार हे क्षेपणास्त्र जपानच्या समुद्राकडे डागण्यात आल्याचं म्हटलं आहे.

तर या हल्ल्याबाबत माहिती देताना जपानच्या संरक्षण मंत्रालयाने एक्सवर म्हटलं आहे की, उत्तर कोरियाकडून एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडण्यात आलं होतं. पण ते क्षेपणास्त्र आधीच समुद्रात कोसळल्याचं म्हटलं आहे.

North Korea Missile Launch
Iran Allows LPG Tanker India : 'मिशन तिरंगा' यशस्वी, इराणकडून भारतीय गॅस जहाजांना हिरवा कंदील!

धक्कादायक बाब म्हणजे, उत्तर कोरियाने अशा वेळी हे क्षेपणास्त्र डागलं आहे. ज्यावेळी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने त्यांच्या वार्षिक "फ्रीडम शील्ड" सरावाला सुरूवात केली आहे. हा सराव 11 दिवस चालणार आहे. या लष्करी सरावावर उत्तर कोरियाने टीका केली आहे.

शिवाय ही तयारी म्हणजे हल्ल्याची तयारी असल्याचंही उत्तर कोरियाने म्हटलं आहे. मात्र, सियोल आणि वॉशिंग्टनचं म्हणणं आहे की हा सराव पूर्णपणे बचावात्मक आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांची बहिणी किम यो-जोंग यांनी या लष्करी सरावांचा निषेध केला आणि अकल्पनीयपणे गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.

तर उत्तर कोरियाने यापूर्वी 27 जानेवारी रोजी पूर्व समुद्राकडे अनेक कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले होते. त्यावेळी हे प्रक्षेपण केवळ एका नवीन, मोठ्या-कॅलिबर मल्टीपल रॉकेट लाँचर सिस्टमची चाचणी करण्यासाठी असल्याचा दावा करण्यात आला होता.

North Korea Missile Launch
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे सचिव असलेल्या मंत्रालयाचं नावच बदललं! राज्य शासनाचा धडाकेबाज निर्णय

दक्षिण कोरियाच्या लष्कराने स्थानिक माध्यमांना दिलेल्या एका निवेदनात म्हटले की, हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाच्या पूर्ण किनाऱ्यावरील समुद्रात सोडले गेले आहे. तर यावर अधिक माहिती देण्यास दक्षिण कोरियाच्या लष्कराने नकार दिला. मात्र, या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाला आता तिसरं महायुद्ध तर होणार नाही ना? ही भीती सतावत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com