pune crime
pune crime sarkarnama
पुणे

किरकोळ वाद नडला : आंबेगावात माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाचा खून

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या तुंबळ हाणामारीत माजी आयपीएस अधिकारी रघुनाथ खैरे यांच्या मुलाचा टोळक्याने खून केला आहे. नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

आंबेगाव परिसरात असणाऱ्या साई विश्व सोसायटीजवळील प्यासा बारच्या पार्किंगमध्ये मृत युवक नरेंद्र खैरे आणि टोळक्यातील युवकांशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. नरेंद्र खैरे यांने बारच्या पार्किंग मधील आपली कार काढत असताना युवकांसोबत वाद झाल्यानंतर आरोपीने नरेंद्र खैरे यांना त्यांच्या नाजुक भागावर मारहाण करुन त्याला जखमी अवस्थेत खाली फेकून दिले. त्यात नरेंद्र खैरेचा मृत्यु झाला आहे.

नरेंद्र खैरेच्या खूनप्रकरणी युवराज कांबळे, ओंकार रिटे, वैभव आदाटे, मनोज सुर्य्रवंशी आणि विष्णू कदम या सहा जणांवर भारतीय विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात माजी सनदी पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाच्या खूनाची घटना घडल्याने पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT