पुणे : भाजपने बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. याबाबतची रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातून नुकताच भाजप प्रदेशाध्यक्षांचा बारामती दौऱ्याची चर्चा होत होती. आगामी काळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांचाही बारामती दौरा होणार असून त्या दृष्टीने दौऱ्याची आखणी करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत. आता राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.(Latest Marathi News)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमचे मिशन महाराष्ट्र चालले आहे, मिशन इंडिया चालले आहे. बारामती हे महाराष्ट्रामध्येच येते, ते महाराष्ट्राबाहेर नाही त्यामुळे मिशन महाराष्ट्र अंतर्गत बारामती आहे,' असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस पुढे म्हणाले, आजचा माझा दौरा राजकीय दौरा नाही. राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी मी इथे आलो आहे. रामोशी समाजाचे मोठे योगदान आहे पण काही कारणामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यात आले नाही. मात्र आताचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काही योजना आणणार आहे.
शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाचे यांचे वकील नीरज किशन कौल यांनी केली. मात्र न्यायालायाने या सर्व बाबींवर २७ सप्टेबरलाच सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्टात केस सुरू असताना, याबाबतीत बोलणं अयोग्य आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या जागा वाटपबाबतीत फडणवीस म्हणाले, आमच्या सोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ओरिजनल शिवसेना आहे. त्याच्यात जे जे लोक आलेले आहेत त्यांच्या कोणाच्याही जागेवर आम्ही कशाला दावा करू ? जर उरलेली शिल्लक सेना जी आहे त्यातील कोणी असेल तर आम्ही आणि मुख्यमंत्री मिळून ठरवू, निर्णय घेऊ.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.