'बापाचे नाव नसते तर उद्धव ठाकरेंना फोटो काढत..' भाजप नेत्याची घणाघाती टीका

Atul Bhatkhalkar : 'सत्ता गमावल्यामुळे उध्दव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.'
Atul bhatkhalkar
Atul bhatkhalkarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता अधिकच शिगेला पोहोचला आहे. भाजपसोबत गेलेला एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील सत्तेचा संघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या पायरीवर पोहचला आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोकदार शब्दात घणाघाती टीका केली आहे.

Atul bhatkhalkar
सकाळी फडणवीसांनी अन् आता मुनगंटीवारांनी घेतला ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार...

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 'सत्ता गमावल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, बापाच्या जीवावर जगणाऱ्यांनी, स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याआधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या स्टुडिओ मध्ये फोटो काढत बसावे लागले असते,' अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

Atul bhatkhalkar
काय सांगता! गणेश नाईक अन् एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात

अजूनही शिवसेनेकडून यावर प्रतिक्रीया आलेली नाही. मात्र भातखळकरांच्या या टीकेमुळे राज्यात सुरू असलेला शिवसेना आणि भाजप संघर्ष आणखी तीव्रतेने पेटणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. दरम्यान राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, 'उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं ते वक्तव्य अमित शहांसाठी लागू होत नाही, खरं तर ते वाक्य तंतोतंत उद्धवजींसाठी (Uddhav Thackeray) लागू होतं. वरून कीर्तन म्हणजे स्वातंत्रवीर सावरकरांचे प्रेम आणि खालून लावणी म्हणजे, खुर्चीचा अन् सत्तेसाठी त्यांनी चालविलेला तमाशा. हे त्यांचं त्यांना स्वतःला वाटतं. पण हे करताना ते एक गोष्ट विसरले की, दुसऱ्यांकडे एक बोट दाखवलं तर उरलेली बोटं आपल्या स्वतःकडेच असतात. त्यामुळे त्यांनी बोललेले ते वाक्य त्यांनाच लागू होतं.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com