Vasant More  Sarkarnama
पुणे

Vasant More : ठाकरे गटाचे नेते म्हणतात 'हमारा टायगर सेफ है, गेले ते कोल्हे अन्....'

Mission Tiger Political Impact : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये 'मिशन टायगर'ची जोरदार चर्चा आहे. शिंदेंच्या सेनेने लॉन्च केलेल्या या मिशन टायगर मुळे ठाकरे सेनेला मोठी गळती लागली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : सध्या राज्याच्या राजकारणामध्ये 'मिशन टायगर'ची जोरदार चर्चा आहे. शिंदेंच्या सेनेने लॉन्च केलेल्या या मिशन टायगर मुळे ठाकरे सेनेला मोठी गळती लागली आहे. या गळतीला मागे टाकत ठाकरे सेनेकडून आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जे गेले ते कोल्हे कुत्रे होते आमच्याकडे टायगर सेफ आहेत अशी भूमिका ठाकरे सेनेच्या नेत्यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यात देखील आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरे (Shivsena UBT) सेनेने तयारी सुरू केली आहे. विधानसभा मतदारसंघानुसार इच्छुक उमेदवारांची चाचपणी ठाकरे सेनेकडून करण्यात येत आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या बैठका गेल्या दोन दिवस सुरू आहेत . या माध्यमातून ठाकरे सेनेकडून शहरातील तब्बल दीडशे जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करण्यात येत आहे. पुण्यातील महापालिका निवडणुकीची जबाबदारी ठाकरे सेनेने वसंत मोरे यांच्याकडे सोपवली आहे. त्यानुसार वसंत मोरे यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

याबाबत माहिती देताना वसंत मोरे (Vasant More) म्हणाले, ठाकरे सेनेने आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. येत्या 15 मार्चला नगरसेवक नाहीत याला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. जोपर्यंत भाजपाला सोयीस्कर वाटत नाही तोपर्यंत ते निवडणुका घेणार नाहीत. मात्र आम्ही आमची तयारी सुरू केली असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे सेनेकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांची चाचणी आमच्याकडून करण्यात येत आहे. पुढील काळात या इच्छुकांना निवडून घेऊन महापालिकेच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

मागील महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने स्वबळावर 138 जागा लढवल्या होत्या आणि या उमेदवारांना आठ लाख 23 हजार मतदान पडलं होतं. साध्य परिस्थितीला या 138 पैकी किती उमेदवार आपल्याकडे आहेत. याबाबतची चाचपणी या बैठकीच्या दृष्टिकोनातून करण्यात येत आहे. सध्या 'मिशन टायगर'ची चर्चा असली तरी जे आमच्याकडून गेले आहेत. ती कोल्हे, कुत्री आहेत आमचे सर्व टायगर सेफ आहेत असं वसंत मोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT