Dattatrey Bharne Sarkarnama
पुणे

'सोमेश्वरचा सभासद होण्यास अजितदादांची चिठ्ठी लागत नाही; पण इंदापुरात सहकारी कारखाना खासगीप्रमाणे चालवतात'

सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अंतिम भाव ३०२० देत असल्याचे जाहीर केले.

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभासद नशीबवान आहेत. त्यांना भावही चांगला मिळतो आणि सभासदत्व घ्यायला कुणाची चिठ्ठी लागत नाही. प्रशांत काटे आपण वाईट वाटून घेऊ नका. पण, आमचा छत्रपती मागे पडतो याचे वाईट वाटते, अशा भावना माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी व्यक्त केली. तसेच, कर्मयोगी, नीरा भीमा कारखान्यात शेतकऱ्यांना सभासदच करून घेत नाहीत आणि मग निवडणूक बिनविरोध करायची. सहकारी कारखाना पण खासगीसारखा चालवतात, अशी परखड टीका हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे नाव न घेता केली. (MLA Dattatray Bharne criticizes former minister Harshvardhan Patil)

सोमेश्वर साखर कारखान्यावर पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात भरणे यांनी सोमेश्वर कारखान्याचे तोंड भरून कौतुक केले. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अंतिम भाव ३०२० देत असल्याचे जाहीर केले. तसेच, विविध विकासकामांची उद्घाटने पार पडली. यामुळे भरणे भारावले होते. या कार्यक्रमात छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे उपस्थित होते.

भरणे म्हणाले, कोरोना संपला नाही काय? तीन हजार भाव मिळूनही टाळ्या वाजवत नाही. तुम्ही पाठीवर थाप दिली तर कारभाऱ्यांना उर्जा मिळेल. तुम्हाला अजित पवार यांचे नेतृत्व मिळाले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाने चांगले काम केले. यामुळे इतका भाव मिळाला. प्रशांतदादा, तुम्हाला वाईट वाटेल, पण मी चेअरमन असताना सोमेश्वर, माळेगावशी दराची चढाओढ असायची. आता आपण अडचणीत आहोत, पण थोडं पुढं जाऊद्या. इंदापूरला तर काही कारखान्यांनी फक्त २१०० रूपये भाव दिला. आता कुठं पुढचं पेमेंट करत आहेत. सोमेश्वरला सभासद होण्यासाठी अजितदादा, चेअरमन यांची चिठ्ठी आणावी लागत नाही. पण इंदापूर व नीरा भीमा कारखान्यास सभासदही करून घेत नाहीत, अशी टीका केली.

सोमेश्वर कारखान्याचे दुसरे युनिट सुरू करा : संजय जगताप

पुरंदर तालुक्यात पुरंदर उपसा योजना व आगामी काळात येणारी गुंजवणी योजना यामुळे उसाचे क्षेत्र वाढणार आहे. सोमेश्वर कारखान्याने दहा गावांना माळेगाव कारखान्याकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुरंदरमधील प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सभासद करून घ्या. तसेच, दरवर्षी ऊस अतिरीक्त होत असल्याने पुरंदरला मध्यवर्ती ठिकाणी दुसरे युनिट सुरू करावे, अशी मागणी आमदार संजय जगताप यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT