शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सुचविले शिवसेनेचे नवे नाव!

निवडणूक आयोगाचा निर्णय आणि अंतर्गत वाद यामुळे शिवसेना अजिबात संपणार नाही. उलट ती अधिक जोमाने वाढेल.
 Uddhav Thackeray-Sharad Pawar
Uddhav Thackeray-Sharad PawarSarkarnama

औरंगाबाद : निवडणूक आयोगाचा निर्णय आणि अंतर्गत वाद यामुळे शिवसेना (Shivsena) अजिबात संपणार नाही. उलट ती अधिक जोमाने वाढेल. शिवसेनेतील जी तरुणपिढी आहे, ती जिद्दीने उठेल आणि शिवसेनेची शक्ती वाढवेल. शिवसेनेचे नवं नाव काय असावं, हे मी नाही तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठरवतील. पण शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) असंही नाव होऊ शकतं, असं म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे नवं नाव अप्रत्यक्षरित्या सुचविल्याचे मानले जात आहे. (Sharad Pawar suggested new name of Shiv Sena to Uddhav Thackeray!)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (ता. ९ ऑक्टोबर) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तत्पूर्वी औरंगाबादमध्ये बोलताना पवार यांनी वरील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. हे असेच होणार, याची मला खात्री होती. हल्ली निर्णय कोण घेतंय, याची मला माहिती नाही. पण, निर्णय हे गुणवत्तेवरच घेतले जातील, याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काही तरी घडेल, असे गेले काही दिवस वाटत होतं, तेच घडलं आहे.

 Uddhav Thackeray-Sharad Pawar
शिवसेना संपवायला पवारच जबाबदार; मोठे लोक कुठं काय गेम करतील, सांगता येत नाही : शिवतारेंचा आरोप

हे सगळं ठरवूनच घडवलं जातंय, या प्रश्नावर मात्र पवारांनी हे तुमचं मत आहे, असे सांगून पत्रकारांच्या कोर्टात चेंडू टोलवला. हे सर्व पूर्वनियोजित होतं, याची माहिती माझ्याकडं नाही. पण हे असं घडलं, असं मला माझं मन सांगत होतं. यापुढे निवडणुकांना समोरे जाताना एखादी शक्तीशाली संघटना असेल आणि ती ठरवेल ती चिन्ह शेवटपर्यंत टिकेल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

 Uddhav Thackeray-Sharad Pawar
शरद पवार आणि भाजप नेत्याचा एकाच गाडीतून प्रवास; चर्चेला उधाण!

शरद पवार म्हणाले की, नवीन चिन्हं घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरे जायचे, असा पर्याय शिवसेनेपुढे आहे. असे प्रकार यापूर्वी अनेक झाले आहेत. मी स्वतः पहिली निवडणूक बैलजोडी या चिन्हावर लढलो. दुसरी निवडणूक गाय-वासरू या चिन्हावर लढलो, तिसरे चिन्ह चरखा, त्यानंतर हाताची पंजा आणि आता घड्याळ असा चिन्हावर मी निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे नव्या चिन्हाचा काहीही परिणाम होत नाही.

 Uddhav Thackeray-Sharad Pawar
माढा, करमाळ्यावर आभाळ फाटलं : जनावरे, वाहून गेली; ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

या सर्व प्रकारामुळे शिवसेना अजिबात संपणार नाही. उलट अधिक जोमाने वाढेल. शिवसेनेतील जी तरुणपिढी ती जिद्दीने उठेल आणि शिवसेनेची शक्ती वाढवतील. या प्रकारामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आहे. हे तीनही पक्ष एकत्र राहतील, यात कोणतीही शंका नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com