Dilip Mohite Sarkarnama
पुणे

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आमदार दिलीप मोहिते स्वतःच उतरले रस्त्यावर!

शनिवारी (ता. ३ सप्टेंबर) सकाळी अकराच्या सुमारास आमदार एका कार्यक्रमासाठी निघाले असताना पंचायत समिती चौकातील वाहतूक कोंडीत त्यांची गाडी अडकली. अर्ध्या तासानंतरही गाडी निघेना, म्हणून ते गाडीतून खाली उतरले आणि कोंडी सोडविण्यासाठी स्वतः चौकात उभे राहिले

राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेड (khed) तालुक्यातील राजगुरूनगर शहरांतर्गत वाहतूक कोंडीच्या समस्येने आज (ता. ३ सप्टेंबर) प्रशासनाला जोरदार चपराक बसली. कारण वाडा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, कोंडीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनाच रस्त्यावर उतरून कोंडी सोडवावी लागली. (MLA Dilip Mohite solved the traffic jam)

शनिवारी (ता. ३ सप्टेंबर) सकाळी अकराच्या सुमारास आमदार एका कार्यक्रमासाठी निघाले असताना पंचायत समिती चौकातील वाहतूक कोंडीत त्यांची गाडी अडकली. अर्ध्या तासानंतरही गाडी निघेना, म्हणून ते गाडीतून खाली उतरले आणि कोंडी सोडविण्यासाठी स्वतः चौकात उभे राहिले. त्यांच्याबरोबर त्यांचे अंगरक्षक पोलिस अधिकारीही खाली उतरले. काही कार्यकर्तेही मदतीला आले. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

वाडा रस्त्यावर पंचायत समिती चौकात रोज वाहतूक कोंडी होते. या भागात असलेल्या टप-या हातगाड्या आणि रस्त्यावरील पार्किंगमुळे या वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्याही तिथेच उभ्या असतात. चौकालगत महात्मा गांधी विद्यालय आहे. तिथे मुलांना न्यायला येणाऱ्या पालकांची वर्दळ असते. त्यांना वाहतूक कोंडीतून कसरत करीत पाल्याला बाहेर काढावे लागते. ही रोजची समस्या असूनही नगरपरिषद, महसूल व पोलीस प्रशासन ती सोडवण्यासाठी काहीही ठोस उपाययोजना करीत नाही. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन मात्र ढिम्म आहे.

वाडा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून इमारती बांधल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. नागरिक रस्त्यावर पार्किंग करीत आहेत. नगरपरिषद, पोलीस यंत्रणा व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आज आमदारांनाच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उभे राहावे लागल्याने या समस्येचे गांभीर्य अधोरेखित झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT