shivajirao Adhalrao, Amol kolhe, Dilip Mohite  Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : घड्याळाची वेळ जुळेना ! सुखाची तुतारी वाजवा; आमदार मोहितेंच्या पुतणीच्या लग्नात कोल्हेंची तुफान फटकेबाजी

Political News : खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीच्या लग्नात खासदार डॉ. अमोल कोल्हेंची दमदार फटकेबाजी पहावयास मिळाली. त्यांनी केलेल्या या फटकेबाजीला आमदार मोहितेंच्या कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त दाद दिली.

Sachin Waghmare

Pune News : पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीचा विवाह समारंभ शनिवारी पार पडला. हे शुभविवाहाचे व्यासपीठ म्हणजे राजकीय टोलेबाजीचे व्यासपीठ ठरले. या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमुळे थोडीफार फटकेबाजी झाली. उपस्थितांनाही चांगेलच हसू आले.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार आढळराव पाटील हे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आहेत तर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत. या दोघांनीही मोहिते यांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्याच्यानिमित्ताने अनेक नेत्यांनी आवर्जून भेट दिली. आमदार मोहितेंशी दिलखुलास चर्चा केली तर फोटो सेशनही झाले. (Amol Kolhe News)

या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देताना डॉ. अमोल कोल्हे यांनी घड्याळ सुटले म्हणून वेळ जुळेना झाली. पण वधू, वरांच्या आयुष्यात समाधान, सुखाची तुतारी वाजावी, असे सांगितले. त्यानंतर आमदार दिलीप मोहिते व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित नागरिक, वऱ्हाडी मंडळी यांच्यात हास्यकल्लोळ उमटला. डॉ. कोल्हे यांच्या वक्तव्याला आमदार दिलीप मोहिते यांनी जोरात हसून उत्स्फूर्त दाद दिली.

माजी खासदार आढळराव पाटील यांनीही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भेट दिली. त्यावेळी त्यांनी शुभेच्छा देताना आमदार मोहिते यांचे कौतुक करून मोहिते यांचा उल्लेख 'माझे स्नेही' असा केला. आढळराव पाटील आणि आमदार मोहिते हे एकाच पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्याने आता त्यांचा स्नेह वाढणार आहे. आमदार मोहिते व माजी खासदार आढळराव पाटील यांनी दिलखुलास चर्चा केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी आमदार सोनवणे यांनी शुभविवाहानिमित्ताने भेट दिली. त्यावेळी त्यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त करताना आमदार मोहिते (Diliprao Mohite) यांचे कौतुक केले. माजी आमदार सोनवणे यांनी त्यांच्या भाषणात आमदार मोहिते हे स्पष्ट वक्ते व शब्दाला पक्के आहेत असे सांगितले. त्यामुळे आमदार मोहिते यांनी माजी खासदार आढळराव पाटील (Shivajiro Adhlrao Patil) यांना दिलेला शब्द नक्की ते पूर्ण करतील असेच जणू काही सांगितले.

काय संदेश दिला, याची उपस्थितांमध्ये चर्चा

खेड, आंबेगाव, जुन्नर,शिरूर, हवेली,भोसरी, पिंपरी-चिंचवड या भागातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. खेड तालुक्यात आमदार मोहिते यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खासदार डॉ. कोल्हे (Amol Kolhe) यांनी त्यांच्या भाषणात घड्याळ आणि तुतारी या पक्ष चिन्हांचा उल्लेख करून घड्याळाची वेळ जुळेना झाली असा टोला देऊन नेमके काय सूचित केले. त्यासोबतच सुखाची तुतारी वाजवावी, असे बोलून नेमका काय संदेश दिला, याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

SCROLL FOR NEXT