Amol Kolhe News : माढा लोकसभेत ट्विस्ट; कोल्हेंच्या मध्यस्थीने लंकेंच्या खेळीची पुनरावृत्ती मोहितेंबाबत होणार का ?

Political News : धैर्यशील मोहितेंना डावलून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिल्याने मोहिते कुटुंब नाराज झाले आहे. त्यांनी निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.
Amol Kolhe
Amol Kolhe Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असे शिरूरचे खासदार आणि तेथील त्यांचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. २७) आपला प्रचार सोडून अचानक थेट सोलापूर गाठले. भाजप नेते आणि माढा (जि. सोलापूर) येथे लोकसभेला डावलले गेलेले धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबाची अकलूज येथे भेट घेतली. शरद पवार यांचा सांगावा घेऊन ते गेल्याची चर्चा या भेटीनंतर ऐकायला मिळाली.

माढ्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची दाट शक्यता कोल्हे-मोहिते भेटीनंतर निर्माण झाली आहे. तेथे दावा ठोकलेले धैर्यशील मोहितेंना डावलून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिल्याने मोहिते कुटुंब नाराज झाले आहे. त्यांनी निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ही संधी साधून या कुटुंबाशी चाळीस वर्षांपासून संबंध असलेल्या शरद पवारांनी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. त्यातून मोहिते हे माढ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Amol Kolhe
Money Laundering Case : सोरेन, केजरीवालांनंतर आणखी एक मुख्यमंत्री अडचणीत; ‘ईडी’कडून मुलीवर गुन्हा

पारनेरचे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या महिन्यात ११ तारखेला पुण्यात भेट घेतली. त्यानंतर तीन दिवसांतच लंकेची घरवापसी झाली. ते आता नगरमधून लोकसभा लढविण्याची शक्यता आहे.

त्यासोबतच काहीसे मोहिते भेटीनंतरही घडण्याची शक्यता आहे. कारण लंकेंना भेटल्यानंतर थांबा, वाट पाहा, काही दिवसांतच चित्र स्पष्ट होईल, अशी नेमकी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली. माढावासीयांच्या भावना मोहितेंपर्यंत पोचवल्या, असेही त्यांनी सांगितले. अडचणीच्या काळात शरद पवार यांना साथ द्यावी, अशी विनंती त्यांना केल्याचे कोल्हे म्हणाले. (Amol Kolhe News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धैर्यशील मोहिते यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते, आमदार रणजितसिंह मोहिते आणि समस्त मोहिते परिवाराची त्यांच्या शिवरत्न या बंगल्यावर कोल्हे यांनी भेट घेतली. या वेळी राजकीय परिस्थितीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्याला डावलले जाताच मोहितेंनी कार्यकर्त्यांसह काही महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर भाजपचे ट्रबल शूटर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohite) यांची समजूत काढण्यासाठी गेल्या आठवड्यात अकलूजला गेले. पण, त्यावेळी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी मोहिते समर्थकांनी केली होती. त्यानंतर बुधवारी कोल्हेंनी लग्नाचे औचित्य साधून मोहिते परिवाराची भेट घेतल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Amol Kolhe
Amol Kolhe : महादेव जानकरांचा महाविकास आघाडीला चकवा?, अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com