Vasudev Kale
Vasudev Kale Sarkarnama
पुणे

'पुरंदरचा आमदार अन्‌ बारामतीचा पुढचा खासदार भाजपचा असेल'

सरकारनामा ब्यूरो

माळशिरस (जि. पुणे) : पुरंदर (Purandar) तालुक्याचा पुढील आमदार (MLA) आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा (Baramati) खासदार (MP) हा भारतीय जनता पक्षाचाच (BJP) होणार आहे, असे भारतीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी ठणकावून सांगितले. (MLA from Purandar and next MP from Baramati will be from BJP : Vasudev Kale)

पुरंदर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी काळे यांनी वरील दावा केला. या वेळी काळे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा त्यागातून तयार झालेला पक्ष आहे. ही सर्वसामान्यांची पार्टी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरेंची) या घराणेशाही आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास अशा पद्धतीने भाजप काम करीत आहे.

पहिल्या महाविकास आघाडी सरकारने आश्वासने पाळली नाहीत. पुरंदर तालुक्यात पक्षपातीपणाने, चुकीच्या पद्धतीने, कोणाच्या इशारावर एखादा अधिकारी वागत असेल तर, भ्रष्टाचारी, नियमांनुसार वागत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही काळे यांनी दिला.

या वेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रदीप आडगावकर, भाजपा किसान मोर्चा राज्य कोषाध्यक्ष राजीव शर्मा, प्रदेश चिटणीस भारतीय किसान मोर्चाचे अंकुश देशमुख, अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा पुरंदर मैना जाधव, भाजपा किसान मोर्चा पुरंदर तालुकाध्यक्ष गोविंद भोसले, भाजपा अनुसूचित जाती जमाती पुरंदर तालुकाध्यक्ष दत्ता धेंडे उपस्थित होते.

भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे म्हणाले की, पुरंदर तालुका विकासाच्या बाबत आता मागे गेला आहे. आगामी काळत तालुक्याचा बॅकलॉग भरून काढू. प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्याला ताकद देऊ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT