Gopichand Padalkar news  Sarkarnama
पुणे

Gopichand Padalkar: शिंदेंनी घरकोंबडा व्हायचं का..."; उद्धव ठाकरेंवर पडळकरांचे टीकास्त्र

Sudesh Mitkar

Pune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी चांगलेच रान पेटवले आहे. दावोस दौरा हा राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी की सरकारच्या पर्यटनासाठी आहे. सरकारी तिजोरीतून ३४ कोटी रुपये खर्च करून करण्यात येत असलेला हा दौरा हा अधिकारी, सरकार आणि मुख्यमंत्र्यांची सहल आहे का? की त्यांच्या कुटुंबासाठी पर्यटन आहे, असा सवाल राज्याच्या विरोधी पक्षाने केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधी पक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगलेच धारेवर धरलेय. मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून रहायचे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

बारामती दौऱ्यावरती असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार अपात्रता निर्णया बाबत ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना उत्तर देताना पडळकर म्हणाले, "निकाल बाजूने लागला तर कोर्ट चांगले, विरोधात गेला की टीका करणे योग्य नाही. जर ठाकरे गटाला निकाल पटला नसेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जावे. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असल्याचं लोकांमध्ये संभ्रम करण्यासाठी तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहात,"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनाधार गमावल्यामुळे विरोधक हतबल झाले असून चुकीचा पाढा पाडण्याचं काम ठाकरे गट करीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून चाललेल्या टीकेला उत्तर देताना पडळकर म्हणाले, दावोसमध्ये मुख्यमंत्री यांनी 3 लाख कोटींचे करार केले जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून घरात बसायचे का? त्यांनी महाराष्ट्रासाठी काही काम करायचं का नाही ? असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला.

अधिवेशन काळात विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही बजावत नाही. अधिवेशनात बोलायचं नाही आणि जेव्हा मुख्यमंत्री एकदा प्रोजेक्ट आणण्यासाठी परदेशात गेले तर टीका करायची नाही, ही दुतोंडी भूमिका विरोधकांची असल्याचे पडळकर म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT