Nagar News: लोकसभेचे पडघम पोलिस दलात; पोलिस ठाण्यांना नवे कारभारी

Nagar Police: दहा निरीक्षकांच्या बाहेरहून नगर जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.
 Police
Police Sarkarnama
Published on
Updated on

Nagar: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातील नऊ पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर, तर दहा निरीक्षकांच्या बाहेरहून नगर जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर जिल्ह्यातील प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले.

नगर जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक झाली. या बैठकीत बदल्यांचे निर्णय घेण्यात आले. यानुसार १७ पोलिस निरीक्षक व सात सहायक निरीक्षक अशा २४ पोलिस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल झाले आहेत.

नगर शहरातील कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, भिंगार कॅम्प, राहुरी, श्रीरामपूर शहर, आश्वी, शनिशिंगणापूर, अकोले, कोपरगाव तालुका शिर्डी, सोनई, राहाता, लोणी, सुपा, पारनेर, राजूरस, बेलवंडी या पोलीस ठाण्यांना नवीन पोलीस अधिकारी मिळाले आहेत. जिल्ह्यात आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढल्यानंतर त्यांची नियुक्ती नगर जिल्ह्यात होईल, असे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड (आर्थिक गुन्हे शाखा), ज्योती गडकरी (नियंत्रण कक्ष), विजय करे (जिल्हा विशेष शाखा), प्रताप दराडे (कोतवाली), अरुण आव्हाड (सुपा), संजय ठेंगे (राहुरी), संजय सोनवणे (आश्वी), अशोक भवड (शनिशिंगणापूर), संतोष भंडारे (बेलवंडी), गुलाबराव पाटील (अकोले), नितीनकुमार चव्हाण (पोलिस अधीक्षक वाचक), आनंद कोकरे (तोफखाना), नितीन देशमुख (श्रीरामपूर शहर), सतीष घोटेकर (मानवसंसाधन), समीर बारावकर (पारनेर), संदीप कोळी (कोपरगाव तालुका), रामकृष्ण कुंभार (शिर्डी) हे पोलिस अधिकारी बदलून आले असून त्यांची नियुक्ती संबंधित पोलिस कार्यक्षेत्रात करण्यात आली आहे.

 Police
khadse Vs Mahajan : विस्तव पुन्हा पेटला; खडसेंनी महाजनांना कोर्टात खेचलं; महाजनांची किंमत 1 रुपया

सहायक निरीक्षक योगेश राजगुरू (भिंगार कॅम्प), माणिक चौधरी (एमआयडीसी), आशिष शेळके (सोनई), कैलास वाघ (लोणी), युवराज आठरे (सायबर सेल), दीपक सरोदे (राजुर), रामचंद्र कर्पे (भरोसा सेल) यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com