BJP Flag Sarkarnama
पुणे

Pune News: आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का,भाजपच्या जवळ असलेल्या नगरसेवकाचे पद जाणार? पहिलं बोगस कुणबी प्रमाणपत्र सापडलं

Daund News: दौंडमधील भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातून नगरसेवक रोहित पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता त्यांचं ओबीसी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं त्यांचं नगरसेवक पद जाणार असल्याचं बोललं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढलेल्या दौंड मधील एका नगरसेवकाचे पद आता धोक्यात आले आहे. जात पडताळणी समितीने त्यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं आहे.

दौंडमधील भाजप आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातून नगरसेवक रोहित पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता त्यांचं ओबीसी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं त्यांचं नगरसेवक पद जाणार असल्याचं बोललं आहे. याबाबत ओबीसी आंदोलन मंगेश ससाने यांनी माहिती दिली आहे.

मंगेश ससाणे म्हणाले, पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दौंड नगरपरिषदेचे प्रभाग क्रमांक 4 मधील निवडून आलेले नगरसेवक रोहित राजेश पाटील यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द केलेले आहे. या रोहित पाटील यांनी ओबीसीच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढवली होती आणि त्या संदर्भामध्ये पडताळणी समितीकडे चालू होती.

परंतु, हे कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी जे पूर्वजांचे तिथे दाखले दिले होते चुकीचे होते. या सर्व प्रकाराला आम्ही हरकत घेतली होती. त्याबाबत आज साडेपाच तास सुनावणी चालली. यावेळी जी वंशावळ ओबीसी दाखला मिळवण्यासाठी देण्यात आली होती ती चुकीची असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखला रद्द करण्याचा निर्णय समितीने घेतला.

मंगेश ससाणे पुढे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, मग नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, यामध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारे चुकीची वंशावळ दाखवून, वेगवेगळी कुठलीतरी कागदपत्रं जमा करून, कुणबी दाखले घेतलेत आणि ओबीसीच्या जागेवर निवडून आलेले आहेत, तर या संदर्भामध्ये आता पडताळण्या चालू आहेत.

या सगळ्या लढाईमध्ये आज कुठतरी आशेचा किरण आम्हाला दिसतोय. याच समितीकडे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा अनेक जणांच्या सुनावण्या झालेल्या आहेत. त्यामुळे यातील देखील बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांचे नगरसेवक पद रद्द होईल, अशी आम्हाला अशा असल्याचा मंगेश ससाणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT