Congress News : काँग्रेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा : धोनरकरांच्या खेळीवर वडेट्टीवारांचा पलटवार : बंडखोर 16 नगरसेवकांवर अपात्रेची टांगती तलवार

Chandrapur Congress, Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar: चंद्रपूर काँग्रेसमधील धानोरकर-वडेट्टीवार गटातील संघर्ष पुन्हा उफाळला असून १६ नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी आणि गटनेतेपदावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Vijay Vadettivar, Pratibha Dhanorkar
Vijay Vadettivar, Pratibha DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेतील कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने मंगळवारी नाट्यमय वळण घेतले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 16 नगरसेवकांना एकत्रित करत गटनेते राजेश अडूर यांना बाजूला करण्याचा प्रस्ताव दाखल केला. त्याचवेळी गटनेते अडूर यांनी धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांना अपात्र करण्याचा प्रस्ताव दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक आहेत. यातील धानोरकर यांनी स्वतःचे 11 आणि वडेट्टीवार गटातील 5 नगरसेवक फोडून वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांना गटनेतेपदावरून हटवण्यासाठी बहुमत गोळा केले. ही कुणकुण लागताच वडेट्टीवार गटही कामाला लागला. शनिवारी (१३ जून) गटनेते राजेश अडूर यांनी सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली. सर्व नगरसेवकांना व्हीपही बजावला.

Vijay Vadettivar, Pratibha Dhanorkar
Wadettiwar vs Dhanorkar dispute : चंद्रपूर महापालिकेत वडेट्टीवार-धानोरकर गट आमनेसामने; ‘लेटर बॉम्ब’ने काँग्रेस नगरसेवकांची कोंडी, राजकीय नाट्य शिगेला

मात्र, या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक १६ नगरसेवकांनी दांडी मारली. आता अडूर यांनी बैठकीला गैरहजर राहिलेल्या १६ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. पण अडूर यांना असा व्हीप बजावण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे धानोरकर समर्थक नगरसेवकांचे म्हणणे आहे.

सुरेंद्र अडबाले नवे गटनेते?

धानोरकर समर्थक नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेत गटनेता बदलण्याची मागणी केली आहे. अडूर यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांना गटनेते पदी निवडण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली. पाठोपाठ राजेश अडूरही समर्थकांसह विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले.

Vijay Vadettivar, Pratibha Dhanorkar
Congress News : खासदार धानोरकरांना मिळालेल्या 15 सह्यांनी वाढवलं वडेट्टीवारांचं टेन्शन : गटनेत्याची उचलबांगडी कन्फर्म

त्यांनी व्हीप डावलेल्या धानोरकर गटातील सर्व १६ नगरसेवकांना अपात्र घोषित करा, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. विभागीय आयुक्तांनी हे दोन्ही प्रस्ताव दाखल करून घेतले असून अद्याप यावर निर्णय झालेले नाही. याच अंतर्गत वादाचा फायदा उचलत भाजपने चंद्रपूरमध्ये महापौर बसवल्याची चर्चा आहे.

दिल्लीतल्या बैठकीनंतरही वाद कायम

चंद्रपूर महापालिकेतील सत्तावाटपावरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वर्चस्ववादाच्या संघर्षाने काही महिन्यांपूर्वी टोक गाठले होते. हे प्रकरण कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचल्यानंतर दिल्लीमध्ये बैठक घेण्यात आली होती.

त्यानुसार महापालिकेतील महापौरपद धानोरकर गटाकडे, तर नेतेपद आणि उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे राहणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेना (ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीला देण्याचे ठरले होते. पण धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वादात भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हाताशी धरत सत्तास्थापन केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Wadettiwar vs Dhanorkar dispute
Congress leaders Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar
Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar amid political developments following Chandrapur Municipal Corporation mayoral election outcome.
Pratibha Dhanorkar and Sudhir Mungantiwar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com