Ravindra Dhangekar Meet Girish Bapat
Ravindra Dhangekar Meet Girish Bapat Sarkarnama
पुणे

Dhangekar Meet Girish Bapat : विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली बापटांची भेट; खासदारांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

सरकारनामा ब्यूरो

Pune News : कसब्यात बलाढ्य भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवाराला धूळ चारल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज (ता. ३ मार्च) खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची भेट घेतली. यावेळी बापट यांनीही चांगले काम करण्याचा सल्ला धंगेकर यांना दिला. विजयानंतर धंगेकर यांनी गुरुवारी (ता. २ मार्च) मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले होते.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने अशी लढत झाली. त्यात धंगेकर यांनी रासने यांचा पराभव केला. त्यानंतर धंगेकर यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. खरं तर या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीय इच्छूक हेाते. मात्र, त्यांना भाजपकडून डावलण्यात आले होते.

धंगेकर यांनी आज सकाळी पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. धंगेकर यांनी बापट यांचे आशीर्वाद घेतले. खासदार बापट यांनीही धंगेकर यांना काम करण्यासंदर्भात मोलाचा सल्ला दिला. चांगली मेहनत घेतल्यामुळे तुला कसब्यात चांगलं फळ मिळाले आहे. योग्य पद्धतीने कामाचे नियोजन कर आणि त्या कामाच पाठपुरावा करत राहा, तुला यश निश्चितपणे मिळेल. काही अडचण आली आणि माझी गरज भासली तर मी तुला मदत करण्यास सदैव तयार आहे, असा वडिलकीचा सल्लाही बापट यांनी धंगेकर यांना दिला.

दरम्यान, कसब्यातील विजयाबद्दल गिरीश बापट यांनी माझे अभिनंदन केले. तसेच, पुढील वाटचालासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत, असेही धंगेकर यांनी या भेटीनंतर सांगितले. या भेटीत धंगेकर यांनी बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या या दोघांमध्ये अनेक विषयावर चर्चाही झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT