Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी नीतेश राणेंनी घेतले ठाकरेंच्या नातेवाईकाचे नाव

नाहीतर उद्या त्यांचाही दिशा सॅलियान, मनसुख हिरेन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्यासारखं होऊ शकतं.
Published on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर आज सकाळी ‘मार्निंग वॉक’ला गेल्यानंतर हल्ला (Attack) झाला आहे. हिंदुजा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या प्रकरणाची विधानसभेतही चर्चा झाली. भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी या हल्ल्याच्या संदर्भाने युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. (Nitesh Rane took the name of Thackeray's relative in Sandeep Deshpande attack case)

आमदार राणे म्हणाले की, मनसेचे संदीप देशपांडे यांचा मनसुख हिरेन, दिशा सॅलियान, सुशांतसिंह राजपूत करण्याचा प्रयत्न झाला आहे. संदीप देशपांडेवर हल्ला करणाऱ्यांनी काही लोकांची नावेही घेतली आहेत. ती नावे उद्या पोलिसांच्या तपासात बाहेर येतील. गेल्या काही महिन्यांपासून हे संदीश देशपांडे वरुण सरदेसाई नावाच्या व्यक्तीसंदर्भाने सातत्याने आरोप करत आहेत.

Nitesh Rane
Devendra Fadnavis News : फडणवीस म्हणतात ‘आम्ही पुन्हा येऊ...!’

गेल्या सरकारमध्ये या वरुण सरदेसाई यांची काय ताकद होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. संदीप देशपांडे हे मुंबई महापालिकेचे अनेक प्रश्न मांडत होता. मगत त्यानंतर त्यांच्यावर हल्ला होतो. नेमकं वरुण सरदेसाई आणि संबंधित लोकांचा यामध्ये काय सहभाग आहे का, याबाबत चौकशी झाली पाहिजे. नाहीतर उद्या त्यांचाही दिशा सॅलियान, मनसुख हिरेन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्यासारखं होऊ शकतं, त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी राणे यांनी केली.

Nitesh Rane
Satej Patil News : आमदार सतेज पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी

दरम्यान, उपचारानंतर संदीप देशपांडे यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर बोलताना देशपांडे म्हणाले की, असे भ्याड हल्ले करुन कुणी जर आम्हांला घाबरविण्याचा प्रयत्न करणार असेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. कधीच आम्ही अशा हल्ल्याला भीक घालत नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com