Ajit Pawar CM Sarkarnama
पुणे

Rohit Pawar on Pawar family politics : पवार कुटुंबाला एकत्र आणण्याचा निर्णय 'या' चौघांवर; आमदार रोहित पवारांनी सांगितली नावं

Mla Rohit Pawar Reacts to Sharad Pawar and Ajit Pawar Reunion in Pimpri Chinchwad Pune : शरद पवार आणि एनसीपीचे अजित पवार यांच्या एकत्र येण्यावर अहिल्यानगरच्या कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Maharashtra politics 2025 : शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं विधान केलं. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावे असे अनेकांची इच्छा आहे, असे या विधानानं राज्यातील राजकारण वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पवार कुटुंबांना राज्यात कोण एकत्र आणू शकतं, अन् त्यावर कोण निर्णय घेऊ शकतं, त्या चौघांची नावं सांगितली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच जोर वाढला आहे.

आमदार रोहित पवार पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवड इथं दौऱ्यावर होते. पवार कुटुंबियांना एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना, ती जबाबदारी चौघे पार पाडतील, असे सांगितले. पण यासंदर्भात आम्हाला कोणताही संदेश नाही, त्यामुळे आम्हाला याच्यावर बोलणं अवघड होतं. पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांच्याशी चर्चा झाल्यावर आम्हाला यावर बोलता येईल, असे आमदार पवार यांनी सांगितले.

हा विषय थोडा कौटुंबिक होतो आणि आपण भावनिक होतो, असे सांगून कुटुंबाच्या बाबतीत हा थोडासा विषय भारतीय परंपरेमध्ये एकत्र राहणे हे लहानपणापासून शिकवलं आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी एकत्र आलं पाहिजे. दोन्ही पक्ष एकत्र आणायचे असतील तर आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवारसाहेब (Sharad Pawar), सुप्रियाताई आणि जयंत पाटील त्याचबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे भेटून एकत्र चर्चा करून, जो कोणता निर्णय घेतील, त्यावर ते आम्हाला भूमिका घेता येईल किंवा चर्चा करता येईल, असे रोहित पवार यांनी म्हटले.

पवारसाहेबांच वय विचारात घेता, त्यांनी स्वतः निर्णय घेतला, तर की मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांच्या हितासाठी पवारसाहेबांनी अनेक बैठका घेतल्या. आम्हाला असं वाटतं की, पवारसाहेबांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी . पवारसाहेब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे निर्णय पवारसाहेब घेतील आणि सुप्रियाताई त्यांच्याच मार्गदर्शनाखाली निर्णय घेतील, असे रोहित पवार यांनी सांगितले.

सर्वांची मतं ऐकावी

पवारसाहेबांनी सांगितलं असेल तर सुप्रियाताई निर्णय घेतील आणि त्या गोष्टीचे स्वागत केले पाहिजे. सुप्रियाताई नवीन पिढीच्या आहेत. त्यांनी जग पाहिला आहे. आजची परिस्थिती कार्यकर्त्यांचे मत, आमदारांचे मत, सुप्रियाताईंना माहिती आहे. त्यामुळे सुप्रियाताई आणि पवारसाहेब कुठलाही निर्णय घेण्याअगोदर एक अधिकृत पक्षाची बैठक घेतील. सर्वांची मते ऐकूनच निर्णय घेतला जाईल, असं मला वाटतं, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

पवारसाहेबांना भेटणार

मी पवारसाहेबांना कधीच फोन करत नाहीत, त्यांचा फोन आला, तर मी त्याला उत्तर देतो. ते मोठे नेते आहेत. त्यांना फोन करण्यापेक्षा भेटून बोलणं उचित राहील. ते उद्या साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी येताय, त्यावेळेस त्यांची भेट घेईल. सुप्रियाताई दिल्लीमध्ये सर्व पक्ष बैठकीला उपस्थित आहेत. त्यांच्याशी फोनवरती याबाबत चर्चा करेल, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

भुजबळांच्या प्रतिक्रियेचं स्वागत...

मी सात वर्ष झाले राजकारणामध्ये, माझ्यापेक्षा 40 ते 50 वर्ष आधी भुजबळसाहेब राजकारणात आहेत आणि पक्षात देखील काम केलं आहे. पवारसाहेब आणि अजितदादांना ते फार जवळून ओळखतात, त्या दृष्टिकोनातून राजकीय ओळख आणि एकत्र काम केल्यामुळे त्यांनी ती इच्छा व्यक्त केली असेल. शेवटी हा पक्षाचा जसा विषय आहे, तसा तो कुटुंबाचा सुद्धा आहे. त्यामुळे सुप्रियाताई आणि अजितदादा हे कुटुंब असल्यामुळे , अजित पवार आणि सुप्रियाताई चर्चा करतील, असे आमदार पवार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT