Siddharth Shirole
Siddharth Shirole Sarkarnama
पुणे

आमदार शिरोळे म्हणतात;भाजपाला गोव्यात किमान २०-२२ जागा मिळतील

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला किमान २० ते २२ जागा मिळतील, असा अंदाज भाजपाचे पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांनी व्यक्त केला आहे.गोवा विधानसभा प्रचार शनिवारी संपला असून उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

शिरोळे यांच्यासह आमदार सुनील कांबळे, आमदार महेश लांगडे, माजी मंत्री बाळा भेगडे तसेच शहर व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले होते.आमदार शिरोळे सुमारे महिनाभर गोव्यातल्या प्रचारात होते. गोव्यातील प्रचाराबाबत ‘सरकारनामा’शी बोलताना आमदार शिरोळे म्हणाले,‘‘ गोव्यात भाजपाला सत्तेत येण्यासाठी अनुकूल वातावरण सुरवातीपासूनच होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी किमान १५ ते १८ जागा मिळतील असा अंदाज होता. मात्र, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेनंतर परिस्थिती आणखी सुधारली.गोव्यात आम्हाला स्पष्ट बहुमत मिळण्यासारखी परिस्थिती आहे. पक्षाला किमान २० ते २२ जागा मिळतील निश्‍तितपणे मिळतील.’’

गोव्यात मुख्य लढत भाजपा व कॉंग्रेसमध्येच आहे.आम आदमी पार्टीला (आप) चांगला प्रतिसाद मिळेल, असे सुरवातीचे वातावरण होते. मात्र, प्रत्यक्ष गेल्या महिनाभरात ‘आप’साठी तितके चांगले वातावरण जाणवले नाही, असा अंदाज आमदार शिरोळे यांनी मांडला.गोव्यातील जनता भाजपाच्या बाजूने उभी राहील याबाबत कोणताही शंका वाटत नाही, असेही आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले.

गोवा निवडणुकीसाठी राज्यभरातून भाजपाचे अनेक आमदार, खासदार व पदाधिकारी गेले महिनाभर मुक्काम ठोकून होते. मुबंईतील खासदार मनोज कोटक, आमदार निरंजन तटकरे, आमदार राम सातपुते,सचिन कल्याणशेट्टी, योगश सागर यांच्यासह अनेकजण प्रचारासाठी केले होते. गोव्यातला मतदारसंघ तुलनेने खूप छोटे आहेत.जेमतेन २५ ते ३० हजार मतदारसंख्येचा एक मतदारसंघ आहे.पुण्या-मुंबईतील सिंगल वॉर्डमध्येदेखील पूर्वी इतकी मतदारसंख्या होती.त्यामुळे प्रचारासाठी अत्यंत सोयीचे मतदारसंघ आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT