Ajit pawar-Sunil Shelke
Ajit pawar-Sunil Shelke sarkarnama
पुणे

देहूतील नगरसेवकांसह आमदार शेळकेंनी घेतली अजितदादांची भेट; पवारांनी दिला हा कानमंत्र

सरकारनामा ब्यूरो

पुणे : नव्यानेच अस्तित्वात आलेल्या श्री क्षेत्र देहू (ता. मावळ) नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १४ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले. तसेच, अपक्ष दोन नगरसेवकांनीही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देहूतील या नवनिर्वाचित सोळा नगरसेवकांसह आमदार शेळके यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. या वेळी पवार यांनी नूतन नगरसेवकांना विकासकामांचा कानमंत्र दिला. (MLA Sunil Shelke meet Ajit Pawar along with new corporators from Dehu)

नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि पारंपारिक विरोधक भाजपचा धुव्वा उडवत आमदार शेळके यांनी देहूवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला. दोन जागांवर अपक्षांनी विजय मिळविला असला तरी तेही राष्ट्रवादीला येऊन मिळाले आहेत. भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसला भोपळाही फोडत आलेला नाही.

श्री क्षेत्र देहू नगरपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सोळा नगरसेवकांसह आमदार सुनील शेळके यांनी आज पुण्यात पालकमंत्री पवार यांची भेट घेतली. या वेळी अजित पवारांनीही नव्या नगरसेवकांना मार्गदर्शन केले. देहूकरांनी भरभरून दिलेल्या मतदानाबद्दल अजित पवार यांनी देहूच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त केले. तसेच, देहूमधील पाणी योजना, भूमिगत गटर योजना यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला, त्यासाठी आवश्यक प्रक्रियेचा तातडीने पाठपुरावा करा. देहूकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी जनतेची सेवा करा,' अशी सूचना करत नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबन भेगडे, देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, प्रवीण झेंडे, बाळासाहेब काळोखे, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT