निरंजन भूमकरांच्या कौतुकासाठी रोहित पवार पोचले वैरागमध्ये : दिला हा शब्द!

नूतन नगरसेवकांचा सत्कार करून वैराग शहराच्या विकासासाठी चांगलं काम करण्याच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
Rohit Pawar-Niranjan Bhoomkar
Rohit Pawar-Niranjan Bhoomkarsarkarnama
Published on
Updated on

वैराग (जि. सोलापूर) : वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीत (nagar panchayat election) दणदणीत यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचा (ncp) झेंडा फडकविणारे निरंजन भूमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वैरागमध्ये जाऊन कौतुक केले. नूतन नगरसेवकांचा सत्कार करून भूमकर यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याचा शब्दही आमदार पवार यांनी या वेळी दिला. (Rohit Pawar went to Vairag and praised Niranjan Bhoomkar and his colleagues)

नव्याने अस्तित्वात आलेल्या वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांपैकी १३ जागा निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्याबद्दल आमदार पवार यांनी वैरागमध्ये जाऊन नूतन नगरसेवक आणि भूमकरांचा सत्कार केला. या वेळी भूमकर आणि रोहित पवार यांच्या खांद्यावर बसवून मिरवणूकही काढण्यात आली. नूतन नगरसेवकांचा सत्कार करून वैराग शहराच्या विकासासाठी चांगलं काम करण्याच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

Rohit Pawar-Niranjan Bhoomkar
डिसले गुरुजींनी काळजी करू नये : शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन नरमले!

आमदार रोहित पवार म्हणाले की, निरंजनभाऊ तुमच्या सर्वांच्या हिताची कामे व्हावीत, यासाठी मंत्रालयात सतत पाठपुरा करण्यासाठी धडपडत असतात. आताची त्यांची धडपड वाया जाणार नाही, यासाठी त्यांच्या पाठीशी ताकद उभा करू. तसेच बंद असलेला संतनाथ साखर कारखाना आपल्या बार्शी तालुक्याचा आहे. तालुक्यातीलच लोकांनी तो चालवावा. हा कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा कसा राहील, यासाठी प्रयत्न करू. तसेच बार्शी तालुक्यातील रस्ते , वैराग ग्रामीण रुग्णालय, स्वतंत्र बाजार समिती आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Rohit Pawar-Niranjan Bhoomkar
बाजार समितीच्या संचालकांसाठी 'गुड न्यूज' : तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा बोनस

या वेळी निरंजन भूमकर, अतुल मोहिते, तृप्ती भूमकर, अनुप्रिया घोटकर, गुरूबाई झाडबुके, आसमा मिर्झा, पद्मिनी सुरवसे, जैतुनबी बागवान, नागनाथ वाघ, अक्षय ताटे, सुजाता डोळसे, अजय काळोखे ,जयश्री घोडके आदींचा सत्कार करण्यात आला.

Rohit Pawar-Niranjan Bhoomkar
निवडणूक लांबणीवर गेली अन्‌ शेकापचा घात झाला; दोन माजी नगराध्यक्षांचा पराभव

जिल्हा परिषद सदस्या रेखा भूमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी तालुकाध्यक्ष राजकुमार पोळ, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मौलाना अब्बास कादरी, शिवम थोरात, संगमेश्वर डोळसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com