sunil shelke sarkarnama
पुणे

Sunil Shelke : आमदार शेळकेंचे वाढले दादांच्या राष्ट्रवादीत वजन; पक्षाने दिली 'ही' मोठी जबाबदारी

Political News : मावळचे आमदार सुनील शेळके राष्ट्रवादीचे प्रदेश युवक प्रभारी

Uttam Kute

Piimpri News : लोकसभा निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाीठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके यांच्यावर पक्षाने एक मोठी जबाबदारी टाकल्याने त्यांचे वजन आता राज्य पातळीवरही वाढले आहे.

सुनील शेळकेंचे (Sunil Shelke)संघटन कौशल्य विचारात घेऊन पक्षाने त्यांच्यावर राज्यातील युवकांचे संघटन करण्याची मोठी जबाबदारी देऊन त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यांना प्रदेश युवकचे प्रभारी करण्यात आले आहे.

दिलेली ही नवी जबाबदारी सार्थ ठरवू,अशी प्रतिक्रिया या नियुक्तीवर शेळकेंनी सरकारनामाला दिली. आपल्यासारख्या कार्यकर्त्यावर दादांनी हा मोठा विश्वास दाखविला असून त्याचा पक्ष वाढविण्यासाठी उपयोग करू, युवकांना ताकद आणि बळ देऊ,असे ते म्हणाले.

शेळके हे अजितदादांचे कट्टर समर्थक आहेत. २०१९ आणि २०२२ च्या बंडात ते अजितदादांसोबत राहिलेले आहेत. गतवेळी २०१९ला विक्रमी मताधिक्याने मावळातून ते निवडून आले.त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे बाळा भेगडे यांची आमदारकीची हॅटट्रिक हुकवली.त्यांचे संघटन कौशल्य आणि आगामी लोकसभा निवडणूक ध्यानात घेऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शुक्रवारी (ता.२) त्यांना ही नवी जबाबदारी दिली. आगामी निवडणूक लक्षात घेऊन युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदारकीची पहिली टर्म असूनही राज्य विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात कामाची छाप शेळकेंनी पाडली आहे. मतदारसंघात प्रत्येक कार्यक्रम हा त्यांच्या संघटन कौशल्यामुळे मेगा इव्हेंट ठरतो. तेच विचारात घेऊन निर्णायकी ठरणारे आणि मोठ्या संख्येने मतदान कऱणाऱ्या युवकवर्गाला आकर्षित करण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे मावळातील या आमदारांचे वजन आता राज्य पातळीवर पक्षातही वाढले आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT