Pune MLC Election : विधान परिषद निवडणुकीच्या पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १० पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक या दोन्ही मतदार संघांसाठी आज (शुक्रवार) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १० पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
त्यामध्ये आधार कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर खासगी औद्योगिक संस्थांद्वारे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार किंवा विधान परिषद सदस्य यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे यांचा समावेश आहे.
तसेच संबंधित शिक्षक/पदवीधर मतदार संघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत, त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरीत मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगात्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेले युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकेवर मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेले जांभळ्या रंगाचेच स्केच पेन वापरा करावा. अन्य पेन किंवा पेन्सिल वापरल्यास मत बाद होईल. तसेचतुमच्या आवडत्या एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ हा आकडा लिहा. पहिली पसंती न नोंदवल्यास मतपत्रिका अवैध ठरते. १' हा आकडा एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर लिहू नका. एकाच उमेदवाराला पहिली पसंती देणे आवश्यक आहे. इतर उमेदवारांना पसंतीनुसार २, ३, ४ असे आकडे देऊ शकता. इतर पसंतीक्रम देणे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.