MLC election News: मतदानाच्या एक दिवस आधीच गेम फिरला : दोन कट्टर विरोधकांची हातमिळवणी; एका भेटीने समीकरण बदलले !

Mahayuti rebellion News : मतदानाच्या एक दिवस आधीच दोन राजकीय कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये गुप्त बैठक देखील झाली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
Amravati Teachers Constituency
Amravati Teachers ConstituencySarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडविल्याने आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 23 ऑक्टेबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यातच अमरावती शिक्षक मतदारसंघातील चुरशीच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर मतदानाला एक दिवस शिल्लक असताना मोठी घडामोड घडली असून दोन कट्टर विरोधकांनी हातमिळवणी केली असून त्यांच्या गुप्तभेटीमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील समीकरण बदलणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधीच दोन राजकीय कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये गुप्त बैठक देखील झाली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

महायुतीचे (Mahayuti) उमेदवार किरण सरनाईक यांच्या विजयासाठी अमरावतीच्या एका महाविद्यालयात बच्चू कडू आणि रवी राणांची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीमुळे आता अमरावती शिक्षक मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे दोन नेते एकत्र आल्याने महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे

Amravati Teachers Constituency
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

अमरावती शिक्षक मतदारसंघ हा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेला आहे. या मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे या एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या वतीने आदिती पोहेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दत्तात्रय लहाने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Amravati Teachers Constituency
Shiv Sena Symbol Case : न्यायाधीशांच्या 'त्या' वक्तव्याने एकनाथ शिंदेंची धडधड वाढली; ठाकरेंच्या शिलेदाराने निशाणा साधला; म्हणाले,'योग्य ठिकाणी धनुष्यबाण...'

या मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे मविआला फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी बंडखोरी केली आहे. त्याशिवाय भाजपकडून तीन जणांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यातच गेलाय एकही दिवसापासून कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे दोन आमदार एकत्र आले आहेत. अमरावतीच्या एका महाविद्यालयात त्यांची गुप्त बैठक पार पडली. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या विजयासाठी हे दोन नेते एकत्र आले असून त्यांची ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 27 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतमोजणीकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com