Vasant More News  Sarkarnama
पुणे

Vasant More Audi Car: ED च्या भीतीनं खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या मनसे नेत्यानं केला मोठा खुलासा; उगाच ईडीवाले यायचे..

सरकारनामा ब्यूरो

Pune News :राजकीय नेत्यांना घाम फोडणारी संस्था म्हणजे ईडी. ईडीमुळे सध्या अनेक नेते तुरुंगाची हवा खात आहेत. भाजप सरकार ईडीचा गैरवापर करीत दबाब आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधक नेहमीच करीत आहेत.

ईडीच्या (enforcement directorate) भीतीने काही उद्योगपती फरार झालेत, तर काही नेत्यांनी भाजपची वाट धरली. या ईडीचा धाक पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यालाही वाटतो. त्यामुळे त्यांनी फेसबुकवर खुलासा केला आहे.

समाजमाध्यमावर त्यांनी स्पष्टीकरण देत आपल्यामागील ईडीच्या चौकशीचा फेरा टाळला का, अशी चर्चा यानिमित्ताने सुरु आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांने कौतुक करीत त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या खास आक्रमक शैलीमुळे पुण्याच्या राजकारणात चर्चेत असलेले नाव म्हणजे मनसेचे नेते वसंत मोरे. तात्यांनी (वसंत मोरे) फेसबूकवर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

वसंत मोरे यांनी आपल्या जुन्या कारला कलर दिला आहे. त्यामुळे त्यांनी नवी आँडी घेतली का, अशी शंका व्यक्त करण्यात येईल, म्हणून तात्यांनी फेसबूक पोस्टकरीत यावर खुलासा केला आहे. तात्यांनी आपल्या त्या लाडक्या कारचे फोटो शेअर केले आहेत.

वसंत मोरे आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात, "ऑडी जुनीच आहे फक्त कलर नवीन केलाय, नाहीतर खासदारकीला नाव आलंय उगाच गैरसमजाने गाडी पाहून ईडी वाले यायचे घरी.." या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ईडीला टोला हाणला आहे.

खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुण्याच्या लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कधीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या या जागेसाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. या जागेसाठी वसंत मोरे हे मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.

"पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिल्यास मी लोकसभा निवडणूक शंभर टक्के लढवेन आणि विजयीही होऊ," असा विश्वास वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.

"तात्या तुम्हाला माझ्या शुभेच्छा फक्त साहेबाकडून टिकीट घ्या, प्रचार सबंध महाराष्ट्रातला महाराष्ट्र सैनिक करेल यात काहीच प्रश्न नाही. तात्याचा तोडीचा एकही काम केलेला नेता किंवा कार्यकर्ता ऐकण्यात किंवा बघण्यात नाही," अशी प्रतिक्रिया फेसबुकवर मनसेचे लातूर तालुकाध्यक्ष श्रीनिवास व्यंकटराव पाटील यांनी दिली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT