Thackeray's Question to Pawar: दोन कार्याध्यक्ष नेमले ? पवारांचा हा मुद्दा ठाकरे गटानं खोडून काढला ; आता कुठं भाकरी चुलीवर..

NCP Appointment Two Working President : एकाचवेळी दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले? असा थेट सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
NCP Anniversary News
NCP Anniversary News Sarkarnama
Published on
Updated on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी एकाचवेळी दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली. राष्ट्रवादीच्या दोन नव्या कार्याध्यक्षांच्या निवडीवर भाजपने टिका केल्यानंतर आता ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून शरद पवारांना चिमटा काढला आहे. एकाचवेळी दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले? असा थेट सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पवारांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

देशाचा आकार पाहता एकाच नेत्याला सर्वच भागात पोहोचणे कठीण असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. (Political Web Stories)

NCP Anniversary News
Rohit Pawar on Lathicharge in Alandi : शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर लाठीहल्ल्याचे पाप केलयं ; पवारांचा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीवर..

पवारांचे हे म्हणणं अग्रलेखात खोडून काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मोठे पक्ष देशाच्या राजकारणात आहेत. त्यांनाही देश मोठा असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज पडली नाही. पण पवारांनी ते केलं, असं सांगत पवारांचा हा मुद्दा खोडून काढला आहे.

आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल, असा टोला अग्रलेखात लगावला आहे.

यावेळी 'सामना'तून राष्ट्रवादी काँग्रेसचं देशात कुठे कुठे अस्तित्व आहे याची आठवण केली आहे. "राष्ट्रवादीने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. राष्ट्रवादीचे नागालँडमध्ये चारपाच आमदार आहे. लक्षद्वीपमध्ये एक खासदार आहे. केरळमध्ये एक दोन आमदार आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? असा सवाल केला आहे. (Political Short Videos)

NCP Anniversary News
Sharad Pawar Threat Case : शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एका आयटी इंजिनिअरला अटक ; दोन्ही अकाउंट..

सामनाच्या अग्रलेखात म्हटलयं..

  1. सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाच्या संघटनेची सूत्रे जाणार होती हे निश्चित होतं.पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून कोणता संदेश दिला आहे?

  2. सुळे यांची नियुक्ती केल्यानंतर पक्षावर घराणेशाहीचा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी पटेलांनाही कार्यकारी अध्यक्ष नेमल्याचंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com