Raj Thackeray  Sarkarnama
पुणे

Raj Thackeray Video : राज ठाकरे बैठकीत भडकले; म्हणाले,'काम जमत नसतील तर...'

Raj Thackeray Pune MNS : व्होट चोरीच्या मुद्यावर राज ठाकरे हे देखील आक्रमक झाले आहेत. पुणे दौऱ्यावर असताना पदाधिकाऱ्यांना सांगितलेले काम न झाल्याने ते संतप्त झाले होते.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर राज ठाकरे प्रचंड संतापले आणि त्यांनी थेट कानउघाडणी केली.

ऑगस्ट महिन्यात राज ठाकरे यांनी पुण्यात येऊन पदाधिकाऱ्यांना मतदारयादी तयार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मतदारयादीतील घोळ उघड करण्यासाठी आणि व्होटी चोरी थांबवण्यासाठी हे काम तातडीने पूर्ण करावे, असे त्यांनी बजावले होते.मात्र आजच्या बैठकीत राज ठाकरे यांनी मतदारयादीबाबत विचारणा केली असता, एकाही पदाधिकाऱ्याने त्या तयार करून आणल्या नव्हत्या. यामुळे संतापलेल्या राज ठाकरे यांनी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तत्काळ बाहेर जाण्याचे आदेश दिले.

"इतके दिवस काय काम केलेत? मतदारयाद्या पूर्ण का केल्या नाहीत? काम जमत नसेल तर पद सोडा!" अशा कडक शब्दांत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना फटकारले.तसेच, "जे दिलेली जबाबदारी पूर्ण करत नाहीत, त्यांना पक्षातून काढून टाका," असे थेट आदेशही त्यांनी दिले.

मतदारयादी, बूथ लेव्हलवरील कामे, पक्ष बांधणी आणि संघटना मजबूत करण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्याने राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अखेर बैठक संपवून राज ठाकरे नाराज मनाने बाहेर पडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT