Thackeray Shinde alliance : शिवसेना नेत्यांचा प्लॅन ठाकरेंनी हाणून पाडला; एकत्र येण्याआधीच डाव उलटवला

Uddhav Thackeray rejects alliance plan : सर्व पक्षांच्या प्रमुखांनी आघाडी आणि युतीचे अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या युती आणि आघाड्यांचे प्रयोग पाहायला मिळणार आहेत.
Uddhav Thackeray Visit Affected Farmers In Beed-Dharashiv News
Uddhav Thackeray Visit Affected Farmers In Beed-Dharashiv NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अस असलं तरी नेमकी महाविकास आघाडी आणि महायुतीची पक्षीय समीकरणे कशी असणार याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. तसेच सर्व पक्षांच्या प्रमुखांनी आघाडी आणि युतीचे अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या युती आणि आघाड्यांचे प्रयोग पाहायला मिळणार आहेत.

अशातच पुण्यातून नवीन युतीचे संकेत हे मिळू लागले होते. पुणे जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे विचार करत असून त्याबाबत बैठका देखील झाल्याचं समोर आलं.

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव या तीन तालुक्यांमध्ये दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी एकत्र येत निवडणुका प्राथमिक चर्चा झाल्या असल्याचं समोर आलं होतं. याबाबत तीनही जिल्हाप्रमुख आणि अध्यक्षांची बैठक देखील झाली होती. तसेच याबाबत जागा वाटप लवकरच जाहीर होणार असल्याचं तीनही नेत्यांनी सांगितले.

याबाबत सरकारनामाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम म्हणाले, की दोन्ही शिवसेना आणि आम्ही एकत्र लढण्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर आणि ठाकरे गटाचे सुरेश भोर यांच्यासह एकत्रित चर्चा केल्याचं सांगितलं होतं.

Uddhav Thackeray Visit Affected Farmers In Beed-Dharashiv News
Ladki Bahin Yojana Update : आतापर्यंत 80 लाख e-KYC पूर्ण; मुदतवाढ मिळणार की लाभ थांबणार? आदिती तटकरेंचं मोठं विधान!

तसेच ही नियोजित बैठक झाली नसली तरी एका कार्यक्रमानिमित्त आम्ही एकत्र आलो असताना याबाबत चर्चा झाली. आम्ही सर्व सकारात्मक असून, वरिष्ठ पातळीवरून देखील स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. यामुळे वेगळी समीकरण जनतेसमोर घेऊन निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत असं निकम म्हणाले होते.

मात्र या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरला असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथे झालेल्या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत शिंदेंच्या सेने सोबत युती करू नका अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या युतीच्या चर्चांना ब्रेक लागणार असल्याचं बोललं जात आहे.

Uddhav Thackeray Visit Affected Farmers In Beed-Dharashiv News
Rahul Gandhi : राहुल गांधींनी टाकलेल्या 'बॉम्ब'चा धमाका; त्या 'ब्राझिलियन मॉडेल'नं सगळं सांगितलं...

ठाकरेंच्या सूचनेनंतर सरकारनामाशी बोलताना ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश भोर म्हणाले, एका कार्यक्रमादरम्यान युती बाबात अनौपचारिक चर्चा झाल्या होत्या याबाबत अधिकृत अशी कोणती बैठक झाली नव्हती. त्यामुळे आम्ही शिंदेंच्या सेने सोबत जाण्याचा कोणताही निर्णय केला नव्हता आणि आता पक्षप्रमुखांच्या सूचना आल्यानंतर तर आम्ही याबाबत विचार देखील करणार नाही. त्यामुळे आमची आघाडी ही महाविकास आघाडी सोबतच असेल असं भोर यांनी स्पष्ट केला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com