sanjay raut, Sandip Deshpande
sanjay raut, Sandip Deshpande sarkarnama
पुणे

शिवसेना 'ढ' टीम , बोरू बहाद्दर कारकून तोंडावर आपटले ; मनसेचा हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत. संदीप देशपांडे यांनी शिवसेना, खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या बोचरी टीका केली आहे. (Sandip Deshpande latest news)

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे चारपैकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik )विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडी मध्ये 'ढ' टीम कोण आहे हे शिवसेनेने सिद्ध केले आहे, असा टोला देशपांडे यांनी लगावला. संदीप देशपांडे यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले.

राज्यसभा निवडणुकीवरुन (rajya sabha election result) मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. भाजपने (bjp) घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे (shivsena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे मत बाद ठरवण्यात आले. यावरुन राजकारण तापलं आहे.

सुहास कांदे यांचे मत नेमकं बाद तरी कसे झाले, त्यांचे मत बाद होण्यामागे महत्वाची भूमिका कोणी बजावली याबाबत सध्या समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे. सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात भाजपच्या दोन आमदारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. भाजपचे आशिष शेलार आणि नितेश राणे यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे कांदेचं मत बाद झालं.

"भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नियोजन, टीमवर्क आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वायफळ बडबड करून अपक्षांचा केलेला अपमान यामुळे भारतीय जनता पक्षाला राज्यसभेत यश मिळाले," असा टोला भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT