Raj Thackeray Sarkarnama
पुणे

MNS Politics: लोकसभेची निवडणूक लढवलेल्या मनसेच्या नेत्यानं साथ सोडली, राज ठाकरेंना मोठा धक्का; पुढची राजकीय वाटचालही ठरली

Pune Political News: मनसेचे सरचिटणीस म्हणून देखील रणजित शिरोळे यांनी पक्षाचं काम केलं होतं. मात्र त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजित शिरोळे यांचे कुटुंब पुण्यातील राजकीय क्षेत्राशी संबंधित राहिलं आहे.

Deepak Kulkarni

Pune News: एकीकडे महायुतीत विधान परिषद शिक्षक व पदवीधर गोकुळची निवडणूक झाल्यानंतर राजकीय वातावरणात घडामोडींना वगे आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुण्यातून चक्क लोकसभेची निवडणूक लढवलेला नेताच आता राज ठाकरेंना इतक्या वर्षांची साथ सोडणार आहे.

राज ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक आणि मनसेचे सरचिटणीस रणजित शिरोळे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. त्यांनी काँग्रेसची वाट धरली आहे. पुण्यातील पक्ष अडचणी असताना शिरोळे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा काँग्रेस प्रवेश हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

मनसेचे सरचिटणीस म्हणून देखील रणजित शिरोळे यांनी पक्षाचं काम केलं होतं. मात्र त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रणजित शिरोळे यांचे कुटुंब पुण्यातील राजकीय क्षेत्राशी संबंधित राहिलं आहे. त्यांचे वडील श्रीकांत शिरोळे हे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

रणजित शिरोळे यांनी मनसेच्या तिकीटावर 2009 मध्ये लोकसभा निवडणुकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी सुमारे 75 हजार मतं मिळवली होती. विशेष म्हणजे शिरोळे हे मतदारसंघामधून तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते. शिरोळेंनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

रणजित शिरोळे हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत राहिले होते. पुण्यातील मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणून रणजित शिरोळे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी मनसेचे सरचिटणीस म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहेत. मात्र,शिरोळे यांनी 2024 मध्येच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मार्च 2023 मध्ये त्यांची मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT