Teachers Constituency: "...तर पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील सर्व जागा महाविकास आघाडीच्या असत्या"; राष्ट्रावादीच्या बड्या नेत्याचा दावा

Teachers Constituency: राज्यातील शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं ३-२ असा सामना जिंकला, पण हा सामना ५-० असा होऊ शकला असता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं केला आहे.
Teachers Constituency Election
Teachers Constituency ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Teachers Constituency: राज्यातील शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं ३-२ असा सामना जिंकला, पण हा सामना ५-० असा होऊ शकला असता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं केला आहे. पण तो होऊ शकला नाही यामागची कारणंही या नेत्यानं सांगितली असून, शिक्षक मतदारसंघात तर सरकारकडून मतदारांवर दबाव टाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही या नेत्याकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस श.प. चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "विरोधीपक्ष एकास एक उमेदवार देऊ शकले असते तर आणि बंडखोरी झाली नसती तर ५-० असा निर्णय लागला असता. पदवीधर असेल किंवा शिक्षक असेल या मतदारसंघातील मतदारांचा कौल सरकारच्याविरोधात होता. शिक्षकांना दबाव टाकण्यात आला होता, जर कोणी शिक्षक विरोधकांच्या प्रचारात दिसला तर त्याच्याविरोधात SIT नेमू अशा धमक्या दिल्या गेल्या होत्या. संस्था चालकांना धमक्या दिल्या गेल्या होत्या. त्यामुळं शिक्षकांच्या बाबतीला निर्णय महायुतीच्या बाजून लागला"

Teachers Constituency Election
Satej Patil: '...तर माझा मुलगा निवडणुकीला उभा राहिला असता'; सतेज पाटलांचा महायुतीला पुन्हा टोला

दरम्यान, एका बाजुला लढाई होती आणि दुसऱ्या बाजुला अर्थ आणि सत्ता याचा उपयोग करुन झाल्यामुळं निवडणुकीचा निकाल आपण बघितला. तरी पण निवडणुकीत पाच पैकी ३ जागा आम्ही निवडून आणल्या तो आमचा विजय आहे, असंही शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर नुकत्याच गोकुळच्या अध्यक्षपदासाठी राज्य शासनानं नियमांत केलेल्या बदलांवरही त्यांनी भाष्य केलं. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे, सर्व संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत असा त्यांचा अट्टाहास आहे. त्यासाठी महायुती कुठल्याही थराला जाऊ शकते. आमदार-खासदार फोडणे, त्यासाठी सत्ता टिकवणे, महापालिका-नगरपालिका आणि आता गोकुळच्या जनतेचा कौल आलेला असतानाही प्रशासकीय नियुक्त्या करुन त्यांना जर अधिकार देणार असतील तर हे चुकीचं आहे.

Teachers Constituency Election
Satara Dcc Bank Result : सातारा DCC बॅंकेची निवडणूक जिंकताच जयकुमार गोरेंचा मित्रपक्षांवरच पहिला हल्ला : दगाफटका, महायुती धर्म, पाडापाडीचा केला आरोप

बाकीच्या ठिकाणी ज्यांना नॉमिनेट केलं जातं त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. पण गोकुळसाठी हा नियम बदलण्यात आला. एवढच काशाला मुंबई-पुणे या ठिकाणच्या बाजार समित्या राष्ट्रीय बाजार समित्या केल्या आणि त्यापद्धतीनं तिथं आपले लोक नियुक्त करुन या सगळ्या संस्था लोकशाहीतून जिंकता आल्या नाहीतर त्या अधिकारशाहीनं जिंकायच्या असं याचं कट-कारस्थान आहे. पण सत्ता कायम राहत नसते जेव्हा बदल होईल तेव्हा त्यांना या सगळ्याचा हिशोबत द्यावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.